एक्स्प्लोर

Barvi Dam News : बारवी धरणाच्या प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीची सोडत संपन्न, 411 बाधितांना लवकरच मिळणार जॉब

Thane Barvi Dam News : ठाणे जिल्ह्याची तहान भागविणार्या बारवी धरणाची दुसऱ्या टप्प्यातील उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे.

Thane Barvi Dam News : ठाणे जिल्ह्याची तहान भागविणार्या बारवी धरणाची (Barvi Dam) दुसऱ्या टप्प्यातील उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर या धरणात बाधित झालेल्याचे  पुनर्वसन करण्यात आलेय. बधितांपैकी 209 जणांना एम आय डी सीच्या नोकरीत (JOB) समाविष्ट करण्यात आले आहे. तर पहिल्या फेरीतील 411 बधितांपैकी कोणाला कोणत्या प्राधिकरनात नोकरी मिळणार आहे, याचा आज सोडतीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला.  उमेदवारांना कोणत्या प्राधिकरणात नोकरी मिळणार हे सोडती द्वारे जाहीर करण्यात आले. एम आय डी सी कडून आज कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिरात ही सोडत  काढण्यात आली. 

बारवी धरणाची उंची वाढविल्यानंतर धरण क्षेत्रात बाधित झालेल्याना मोबदला म्हणून  पुनर्वसन करण्याबरोबरच कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत समविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1204 प्रकल्पग्रस्तांमधील 209 बाधितांना एमआयडीसीने नोकरी दिली असली तरी पहिल्या फेरीत पात्र ठरलेले 411 जण अजूनही नोकरीच्या प्रतीक्षेत होते. या उमेदवारांनी पात्रतेचे निकष पूर्ण केल्याने या उमेदवारांना तातडीने नोकरीत समाविष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. एमआयडीसीने बारवीतून पाणी उचलणाऱ्या सर्व प्राधिकरणाना या उमेदवारांना तातडीने सेवेत दाखल करून घेण्याचे पत्र पाठवले  होते. यांनातर आता पहिल्या टप्प्यात पात्र उमेदवारांसाठी प्राधिकरण निश्चित करण्यासाठी एमआयडीसीकडून सोडत काढण्यात अली. पात्र उमेदवारांना ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, स्टेम आणि जीवन प्राधिकरण या प्राधिकरणापैकी कोणत्या प्राधिकरणात नोकरी मिळणार हे निश्चित करून त्या प्राधिकरणासाठी अधीक्षक अभियंता सुधीर नागे आणि प्रांताधिकारी अभिजित भांडे पाटील यांच्या हस्ते पत्र देण्यात आले. 

आता त्या प्राधिकरणाकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर या उमेदवारांना नोकरी मिळणार आहे. तर उर्वरित 548 बधितांना दुसऱ्या टप्प्यात नोकरी दिली जाणार आहे. या पात्र उमेदवारांनी संबंधित विभागाकडे अर्ज करावेत. या अर्जाची छाननी करून प्रक्रिया पूर्ण करत दुसऱ्या टप्प्याची सोडत काढली जाणार असल्याचे एमयडीसी चे अधीक्षक अभियंता सुधीर नागे यांनी  संगीतले.

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
धक्कादायक! तोल गेला हात निसटला, धावत्या लोकलमधून थेट खाली पडला, मुंबई फिरण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय युवकाचा  मृत्यू
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget