Sushma Andhare : आमच्यामुळे श्रीकांत शिंदेंना गुलाल, पण यावेळी तो लागणार नाही; कल्याणच्या उमेदवारीवर काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
Kalyan Lok Sabha Election : ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून करण्यात आली आहे.
ठाणे : आमच्यामुळे श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना कल्याणमधून गुलाल लागला होता, तर आम्ही तो गुलाल काढून घेऊ शकतो, आम्ही ते करून दाखवू असं जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दिलं आहे. येत्या आठ दिवसात कल्याणचा उमेदवार (Kalyan Lok Sabha Election) जाहीर होणार असून आपण त्यासाठी प्रचार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कल्याणमधील सभेत त्या बोलत होत्या. या सभेत सुषमा अंधारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांचं भाजप नेत्यांवर सडकून टीका केली . मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद यात्रा अंतर्गत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी बुधवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी त्यांनी दहा ते बारा ठिकाणी भेटीगाठी घेतल्या .
महिला अत्याचाराच्या घटनांबाबत फडणवीसांनी श्वेतपत्रिका काढावी
मनोज जरांगे पाटील यांचे एसआयटी चौकशी लावली आहे, याबाबत बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. आम्ही मनोज जरांगेंच्या भाषेचं समर्थन करणार नाही. मात्र देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यापासून त्यांच्या कार्यकाळात महिलांना त्रास देण्याच्या, अत्याचाराच्या घटनात वाढ झाली आहे . देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री असतानाच्या कालावधीत झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनासंबंधात श्वेतपत्रिका सादर करावी अशी मागणी मी करणार असल्याचं सुषमा अंधारे यांनी सांगितलं.
कल्याण पोलिसांकडून शिवसैनिकांना देण्यात आलेल्या नोटिसीचे भाषा हास्यस्पद
सुषमा अंधारे यांच्या दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही शिवसैनिकांना नोटीस पाठवल्या होत्या. या नोटीसंबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांना देण्यात आलेल्या नोटिसीची भाषा अत्यंत हास्यस्पद असल्याचं सांगितलं. शिवसैनिकांचं खच्चीकरण करण्यासाठी, दहशतीचे वातावरण तयार करण्यासाठी जर नोटीसा देण्यात आल्या असतील तर त्याला उत्तर देणे गरजेचे होतं, शिवसैनिक नाउमेद न होणे ही माझी जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं.
आठ दिवसात कल्याणचा उमेदवार जाहीर होणार
ठाकरे गटाकडून सुषमा अंधारे यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. तशी मागणी देखील स्थानिक शिवसैनिकांकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी शिवसैनिकांनी केलेल्या मागणीचा मी मनापासून आदर करते, परंतु मला व्यक्तिगत विचाराल तर अजून माझ्यापर्यंत अधिकृत अशी माहिती पोहोचली नसल्याचं त्या म्हणाल्या.
कल्याण लोकसभेत पक्षप्रमुख जो उमेदवार देतील त्याच्या प्रचार मी करेन, मी या मतदारसंघात तळ ठोकून राहणार, याचा अर्थ असा नाही की मी लगेच निवडणूक लढणार आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुक्त संवादाच्या दौऱ्याअंतर्गतच कल्याण लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी घेतल्या, उमेदवार जाहीर करणे हे पक्षप्रमुखांच्या अधिकारात आहे. पुढील आठ दिवसात कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवार निश्चितपणे जाहीर होईल. जो कोणी उमेदवार असेल तर उमेदवारासाठी सगळे शिवसैनिक ताकतीने लढतील असे सुषमा अंधारे यांनी सांगितले
मनोज जरांगे पाटलांवर गुन्हे दाखल करायचे तर नितेश राणेंच्या भाषेचं काय?
मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत एसआयटी नेमण्यात येणार आहे . याबाबत बोलताना सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री संविधानिक पद आहे त्या पदावरच्या व्यक्तींवर टीका करताना संयम समतोल असावा एकेरी भाषेचा वापर करू नये त्याचं कुणी समर्थन करणार नाही असे सांगितले. जरांगेंवर गुन्हा दाखल करायचे असतील तर नितेश राणेंच्या भाषेचं काय? नितेश राणेंवर का गुन्हे दाखल होत नाहीत? असा सवाल त्यांनी केला. जरांगेच्या आंदोलनामागे कोण आहे, यासाठी जर एसआयटीने माहिती दिली तर बारसू रिफायनरी, आळंदी येथे झालेल्या हल्लाबाबत देखील एसआयटी नेमावी, म्हणजे सत्य बाहेर येऊ द्या असं त्या म्हणाल्या.
ही बातमी वाचा: