एक्स्प्लोर

Malang Gad : हाजी मलंग की श्रीमलंगगड? वाद पेटण्याची शक्यता; श्रीमलंगडाची मुक्ती होणार, मुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन

Haji Malang Dargah : येत्या काळात मलंगड मुक्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यानंतर हाजी मलंग की श्रीमलंगगड हा वाद पेटण्याची शक्यता आहे. 

ठाणे: गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग (Haji Malang Dargah) किंवा मलंगगडाचा (Malang Gad) वाद सुरू आहे. ही जागा कोणत्या धर्मियांची आहे याबाबत अद्याप योग्य संशोधन किंवा खुलासा झालेला नाही. मात्र हा वाद अजूनही सुरू आहे याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी भाष्य केलं. लोकांच्या मलंगगड मुक्तीच्या भावनांची मला कल्पना आहे आणि त्या पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं. त्यानंतर पुन्हा एकदा हाजी मलंग की श्रीमलंगड आहे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलेला आहे. 

गेली अनेक वर्षे ठाणे जिल्ह्यातील हाजी मलंग किंवा मलंगगडाचा वाद सुरू आहे. यासंदर्भात  संशोधन सुरू आहे आणि दोन्ही धर्मियांकडून वेगवेगळे दाखले देखील दिले जातात. या जागेचा उल्लेख हाजी मलंग, मलंगगड, श्रीमलंग, मच्छिंद्रनाथ समाधीस्थळ असा वेगवेगळ्या प्रकारे उल्लेख करण्यात येतो. गेली अनेक वर्षे या प्रार्थनास्थळाबाबतीत चर्चा, आंदोलन आणि वाद सुरू आहेत. त्यामुळे हे स्थान नक्की दर्गा आहे की मंदिर हा एक वादाचा मुद्दा होऊन बसला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासूनचा वाद

मलंगगडावरून हिंदू आणि मुस्लिम समाजात गेल्या अनेक वर्षांपासून वाद चालू आहे. दोन्ही धर्माचे लोक या जागेवर दावा करतात. काही वर्षांपूर्वी शिवसेना नेते आनंद दिघे यांनी मलंगगड मुक्तीसाठी आंदोलन केलं होतं. शिवसेना आणि स्थानिक हिंदू संघटनांचं हे आंदोलन अजूनही चालू आहे. 

मंगळवारपासून ठाणे आणि पालघरच्या सीमेवर असलेल्या मलंगगड येथे अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे. या हरिनाम सप्ताहमध्ये वारकऱ्यांनी पुन्हा श्री मलंगडाचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बोलून दाखवला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मुद्दा निकाली लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असं आश्वासन उपस्थित त्यांना दिले. 'श्री आई भवानी शक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे' अशी घोषणाबाजी या कार्यक्रमात करण्यात आली.

हाजी मलंग की श्रीमलंगड यावरून हिंदू मुस्लिम बांधवांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. त्यामध्ये आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट हिंदू बांधवांच्या भावना लक्षात घेत आश्वासन दिल्यानंतर विरोधकांनी देखील आता त्यांच्यावर टीका केलेली आहे.

श्रीमलंगड  की हाजी मलंग, वाद काय आहे?

श्री मलंगड येथे ही समाधी नाथपंथातील संत मच्छिंदरनाथ यांची असल्याचे गोरखनाथ पंथ मानणारे लोक सांगतात. ही बाजू सांगते की दरवर्षी पालखी निघते, रोज पूजा होते, नैवेद्य अर्पण केला जातो. तर दुसरीकडे 13 व्या शतकात येमेनहून आलेले सुफी संत फकीर हाजी अब्दुल रहमान शाह मलंग उर्फ ​​मलंग बाबा यांची ही कबर असल्याचे दुसरी बाजू सांगते. 

दोन्ही बाजूंनी जमिनीचा एक एक भाग ताब्यात घेतला आहे. यावरून दोन्ही पक्षांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. 80 च्या दशकात शिवसेनेने पहिल्यांदाच हा मुद्दा उपस्थित केला होता. हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे

ठाणे जिल्ह्यातील मलंगगड येथे असलेल्या प्रार्थनास्थळाला दर्गा म्हणायचे की समाधी यासंदर्भातील न्यायालयीन वाद अद्याप प्रलंबित आहे. तो वाद मिटल्याची कागदपत्रे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. मात्र आजही श्रीमलंगड की हाजी मलंग यावरून हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये वाद सुरू आहे. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी श्री मलंगगड हरिनाम सप्ताहात मलंगड मुक्ती केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असं आश्वासन दिले. त्यामुळे पुढील काळात यावरून वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole on Shikhar Bank Scam : भाजपने घोटाळेबाजांना सोबत घेतल्यामुळे जनतेच्या मनात उद्रेकMajhi Ladki Bahin Yojana Form | माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म कसा भरायचा? A To Z प्रोसेसWorli Hit and Run Case : मासे घेऊन घरी येत असताना पत्नीला उडवलं, हुंदका आवरत पतीचा आक्रोशWorli Hit and Run Accident : वरळी अपघातातील गाडीचं परीक्षण करण्यासाठी RTO टीम दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde on Uddhav Thackeray : गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
गेटमधून कोणाला आत न घेणारे शेतावर पोहोचले याचा आम्हाला आनंद; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
उद्धव ठाकरेंचा मनोज जरांगेंना फोन, पण...; मराठा-ओबीसी बद्दल काय म्हणाले पाटील
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
योगी-मोदी आले, पण कुणीही टिकलं नाही, आता विधानसभेच्या कामाला लागा; प्रणिती शिंदेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
Abhay Verma : 'मुंज्या' अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
मुंज्या फेम अभिनेत्याने आलिया भट आणि सुहाना खानसोबत काम करणं नाकारलं; मुलाखतीत केला खुलासा
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
शेतकरी पुत्रांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित; निलेश लंकेंच्या आंदोलनावर विखे पाटील काय म्हणाले?
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Video : ठाणे जिल्ह्यात मुसळधारा, मुरबाड-वाशिंद रस्त्यावरील पूल पाण्याखाली; 18 गावांचा संपर्क तुटला
Sambhajiraje Chhatrapati : विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
विशाळगड अतिक्रमणावरून संभाजीराजे आक्रमक; 13 जुलैला शिवभक्तांसह गडावर देणार धडक
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
वारी होईपर्यंत VIP लोकांना आमच्यासारखे दर्शन रांगेत पाठवा; पंढरपुरात भाविक संतप्त 
Embed widget