एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Thane Rave Party Case :  ठाणे रेव्ह पार्टी प्रकरणी दोघांना अटक, जागा मालकाचा शोध सुरू; पार्टीत सहभागी झालेल्यांवर कोणती कारवाई?

Thane Rave Party Case :  रेव्ह पार्टी सुरू असलेल्या जागा मालकाचा शोध सुरू आहे. तर, सहभाग असलेल्या 90 हून अधिकजणांची सुटका केली असल्याची चर्चा सुरू आहे.

Thane Rave Party Case :   नववर्षाच्या पूर्व संध्येला ठाण्याच्या कासारवडवली गावात खाडीलगत आयोजित करण्यात आलेल्या रेव्ह पार्टीवर ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने (Thane Police Crime Branch) छापा मारत ही पार्टी उधळून लावली होती. ठाणे पोलिसांनी (Thane Police) या प्रकरणी दोन आयोजकांसह 97 जणांना ताब्यात घेतले होते. पोलिसांनी आयोजक डोंबवली येथील तेजस कुबल आणि ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या सुजल महाजन यांना अटक केली आहे. तर, रेव्ह पार्टी सुरू असलेल्या जागा मालकाचा शोध सुरू आहे. तर, सहभाग असलेल्या 90 हून अधिकजणांची सुटका केली असल्याची चर्चा सुरू आहे. 

ठाणे रेव्ह पार्टी प्रकरणी डोंबवली येथील तेजस कुबल आणि ठाण्यातील कळवा परिसरात राहणाऱ्या सुजल महाजन यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना 4 जानेवारी 2024  पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर रेव्ह पार्टीसाठी जागा देणाऱ्याचा शोध सुरू असून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

गुन्हे शाखा युनिट-5 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके आणि त्यांचे सहकारी पोलीस पथकाने वर्षाच्या अखेरीस यंदाची मोठी कारवाई केली. याच पथकाने वर्षभरात अमली पदार्थ विक्रीस आलेल्या अनेक आरोपींना गजाआड करून लाखो कोट्यवधीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. 31 डिसेंबरच्या पहाटे कासारवडवली खाडी लगत आयोजित रेव्ह पार्टीची माहिती मिळताच कारवाई करून 8 लाखापेक्षा जास्त रक्कमेच्या ड्रग हस्तगत केले. रेव्ह पार्टी आयोजन करणाऱ्या तेजस कुबल आणि सुजल महाजन यांना अटक केली. 

या पूर्वीही डिसेंबर महिन्यात रेव्ह पार्टी केल्याची माहिती

ठाणे गुन्हे शाखा युनिट 5 च्या ताब्यातील आरोपी तेजस कुबल आणि सुजल महाजन यांच्या चौकशीत या जोडगोळीने यापूर्वीही डिसेंबर महिन्यात रेव्ह पार्टी केल्याची सूत्रांनी दिली. त्यानंतर त्यांनी 31 डिसेंबरच्या पार्टीचे आयोजन केले.

पार्टीत सहभागी 95 जणांना समुपदेशन करून सोडले?

कासारवडवलीतील रेव्ह पार्टी सहभागी झालेल्या आयोजक व्यतिरिक्त 95 जणांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने ताब्यात घेऊन त्यांना समुपदेशन करून सोडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.

एमडी, चरस, गांजासह अंमली पदार्थांचा वापर

थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनसाठी मोठ्या प्रमाणात तरुणाई बेधुंद अवस्थेत पार्टीमध्ये सामील झाल्याचं दिसून आलं. एका खाजगी प्लॉटमध्ये ही रेव्ह पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये नशा करण्यासाठी विविध अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. एमडी, चरस, गांजा, अल्कोहोल असे विविध अंमली पदार्थ या पार्टीमध्ये पुरवण्यात आले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget