एक्स्प्लोर

Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident Live Updates : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री

ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळून 17 जणांचा मृत्यू झालाय.

LIVE

Key Events
Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident Live Updates : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री

Background

Samruddhi Mahamarg Thane accident Live Updates : ठाण्याजवळ शहापूर (shahapur) तालुक्यातील सरलांबे इथं समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडलीय. पुलाचं काम सुरु इसताना गर्डर मशिन कोसळली आहे. यामध्ये आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी झाले आहेत. आणखी सहा जण गर्डर मशिनच्या खाली अडकल्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्याचे रस्ते विकास सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी घटनास्थळी भेच दिली. गर्डर मशिनखाली दाबले गेलेल्या कामगारांना बाहेर काढण्यास प्रथम प्राधान्य देत आहोत. ही दुर्घटना कशी झाली याची चौकशी केली जाईल. तसेच मतृांच्या कुटुंबीयांना मदत देखील केली जाईल असे दादा भुसे म्हणाले. 

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सरु आहे. रात्रीही समृद्धी महामार्गाचे काम सुरु होते, त्यावेळीच ही दुर्देवी घटना घडली आहे. शाहपूर सरलांबे येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्डर मशीनला जोडणारी क्रेन आणि स्लॅब तब्बल शंभर फूट उंचावरुन मजूरांच्या अंगावर कोसळली. यामध्ये 16 मजुरांचा मृत्यू झाला आहे. मृतदेह शाहपूर उप जिल्हा रुग्णालयात आणले आहेत. तीन ते चार जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांना लोकमान्य टिळक पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. त्याआधीच काही तास ही दुर्देवी घटना घडली आहे. 

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु

दरम्यान, सध्या NDRF कडून डॉग स्कॉडच्या माध्यमातून पुलाच्या ढिगाराखाली सर्च ऑपरेशन सुरु आहे. आत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ठाणे TDRF ची एक तुकडी घटनास्थळावर दाखल झाली आहे. समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या आणि तिसऱ्या टप्प्याचे काम सुरु आहे. हे काम येत्या डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा शंभर किलोमीटरचा टप्पा आहे.  डिसेंबर 2022  मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी ते नागपूर दरम्यानच्या 520 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले. नागपूर ते इगतपुरी तालुक्यातील भरवीर गावापर्यंतचा एकूण 600 किमीचा रस्ता खुला झाला आहे.

12:59 PM (IST)  •  01 Aug 2023

नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लॉन्च करणाऱ्या VSL कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल

Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident : नवयुगा इंजीनियरिंग कंपनीचे स्थानिक कॉन्ट्रॅक्टर आणि गर्डर लॉन्च करणाऱ्या व्ही एस एल कंपनीच्या स्थानिक कॉन्ट्रॅक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कलम 304 अ, 337, 338 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजी आणि हलगर्जीपणामुळं कामगारांचा मृत्यू झाला आहे. कामगारांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी असलेल्या प्रेम प्रकाश साव यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

11:29 AM (IST)  •  01 Aug 2023

काही करण्याआधीच 35 मीटर वरुन आम्ही खाली कोसळलो, जखणी कर्मचाऱ्याने सांगितला थरार

 Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident : भूतकाळात कधी शहापूर रुग्णालयात एवढे मृतदेह एकत्र आले नव्हते अशी परिस्थिती आज शहापूर रुग्णालयाची आहे

समृद्धी महामार्गावर घडलेल्या घटनेचा प्रत्यक्षदर्शी यांच्याशी बातचीत केले असता त्यांनी सांगितलं मला स्थानिक नागरिकांनी जीवनदान दिलं

तर हे संपूर्ण घटना अचानक घडली काही करण्याआधीच 35 मीटर वरून खाली आम्ही कोसळलो ढिकाऱ्याखाली माझे अनेक साथीदार होते अशी माहिती जखमी कर्मचाऱ्याने दिली. 

10:26 AM (IST)  •  01 Aug 2023

Shahapur accident : घटनेची सखोल चौकशी केली जाणार : मंत्री रविंद्र चव्हाण

काल रात्री साडेअकराच्या सुमारास समृद्धी महामार्गाचे शहापूरमध्ये काम सुरू असताना दुर्दैवी दुर्घटना घडली आहे...

या घटनांमध्ये 17 मजुरांचे मृत्यू झाल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. काहीजण अजून आत मध्ये अडकले आहेत त्यांच्या शोध NDRF च्या माध्यमातून सुरू आहे...

गार्डरच्या मोठा ढिगाऱ्या असल्यामुळे सर्च ऑपरेशन मध्ये अडचण निर्माण होत आहे...

काही नजर चुकली असेल त्यामुळे ही घटना घडली असावी...

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे...

घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे..

चौकशी मध्ये जो दोषी मिळाला त्याच्यावर कठोर कारवाई सरकार करणार आहे....

09:51 AM (IST)  •  01 Aug 2023

Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident : गार्डर बसवताना पिलरच्या वर विद्युत हाय टेन्शन वायरमध्ये शॉक लागून घडली घटना, NDRF कडून ऑफ रेकॉर्ड माहिती

 Samruddhi Mahamarg Thane Shahapur accident : समृद्धी महामार्ग दुर्घटनेची प्राथमिक माहिती समोर आली आहे

रात्री गार्डर बसवताना पिलरच्या वर विद्युत हाय टेन्शन वायर मध्ये शॉक लागून ही घटना घडली आहे...

NDRF कडून ऑफ रेकॉर्ड माहिती

हाय टेन्शन विद्युत पोल मधून दोन तार खाली तुटला आहे...

09:45 AM (IST)  •  01 Aug 2023

Shahapur Accident : मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार : मुख्यमंत्री

Samruddhi Mahamarg Shahapur Accident : शहापूर सरलांबे येथे समृध्दी महामार्गावर मध्यरात्री क्रेन कोसळून झालेल्या दुर्दैवी अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 17 जण मरण पावले असून मृत कामगारांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीची घोषणाही त्यांनी केली असून जखमींवर तातडीने शासकीय खर्चाने योग्य ते उपचार करावेत असे निर्देश त्यांनी दिले आहेत. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 18 February 2024Santosh Deshmukh Case | 'अनैतिक' कट, संतोष देशमुख प्रकरणावरून वर्दीवर आरोप Special ReportDevendra Fadnavis on MLA's Security | आमदारांची सुरक्षा घटली, कुणाकुणाची सटकली? Special ReportSambhajiRaje Wikipedia | छत्रपती संभाजीराजेंवरील विकीपीडियावरचा मजकूर कुणी बदलला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
लोकल सेवा बाधित होणार नाही, रुळावर पाणी साचणार नाही यासाठी पावसाळ्यापूर्वी कामे करा; आयुक्तांचे आदेश
Bhiwandi : आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर तुफान दगडफेक, भिवंडीत पोलिस वाहनाची तोडफोड
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
मुंबईतील 30 दुकानांवर महापालिकेचा जेबीसी फिरला; 50 पोलीस अन् अधिकाऱ्यांच्या सुरक्षेत कारवाई
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
संभाजी महाराजांबद्दल गौतम गंभीरचे गौरवोद्गार, 2 शब्दात वर्णन; 'छावा' पाहून भारावला आकाश चोप्रा, म्हणाला...
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
डोंबिवलीतील 6,500 कुटुंबांना 10 दिवसांची मुदत; बेघर होणाऱ्यांचा टाहो; मुख्यमंत्री फडणवीस स्पष्टच बोलले
HSC Exam : वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
वसईत परीक्षा गैरव्यवहाराचा पर्दाफाश, डमी बनावट उमेदवार पकडला, मोठे रॅकेट उघडकीस
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
शिवसेना आमदारांची सुरक्षा कपात, मंत्री शंभूराज देसाईंनी सांगितला निकष; म्हणाले, नेत्यांची सुरक्षा पक्षावर ठरत नाही
Beed News: ....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
....तर खैर नाही! बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत पुन्हा ऍक्शन मोडवर, 150 आरोपींना पोलिसांचा समज
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.