एक्स्प्लोर

Thane News : ठाण्यातील मासुंदा तलावावर पुन्हा 50 कोटींचा खर्च!

मासुंदा तलावावर आमदार- खासदार निधी, महापालिकेचा निधी, स्मार्ट सिटीचा निधी असा विविध माध्यमातून आधीच खर्च झालेला आहे. तरीही पुन्हा एकदा मासुंदा तलावावर आणखी सुमारे 50 कोटींपर्यंतचा खर्च होत असल्याचे समोर आले आहे.

 ठाणे :  विविध सुशोभीकरण करून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लोकार्पण केलेल्या ठाण्यातील मासुंदा तलावाचे पुन्हा एकदा सुशोभीकरण करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या स्मार्टसिटी योजनेतून गेल्या चार वर्षांत 11 कोटी खर्चून सुशोभिकरण केल्यानंतर पुन्हा याच तलावावर एमएमआरडीएकडून तब्बल 50 कोटी खर्च करून विद्युत झगमगाटाचा बेत आखण्यात आला आहे. यासंदर्भातील निविदा प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. दरम्यान आता हा एवढा खर्च पुन्हा कशासाठी असा प्रश्न उपस्थित झाला असून निवडणुकीच्या तोंडावर उधळपट्टी करण्यात येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

सहा हेक्टरचे पाणथळ क्षेत्र असलेल्या मासुंदा तलावावर आमदार निधी, खासदार निधी, सरोवर संवर्धन निधी, महापालिकेचा निधी, स्मार्ट सिटीचा निधी असा विविध माध्यमातून आधीच खर्च झालेला आहे. तरीही पुन्हा एकदा मासुंदा तलावावर एमएमआरडीएच्या माध्यमातून आणखी सुमारे 50 कोटींपर्यंतचा खर्च होत असल्याचे समोर आले आहे. मासुंदा तलावाच्या विद्युत सुशोभिकरणासाठी 49 कोटी 61 लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सुमारे 35 कोटी 57 लाख रुपये खर्च करून तलावामध्ये संगीत आणि प्रकाश योजनेसह कारंजे आणि लेझर शोची निर्मिती करण्यात येणार आहे. तर तलावामध्ये 71 लाख 19 हजार रुपये खर्च करून तरंगत्या व्यासपीठाची निर्मितीचा प्रस्ताव आहे. या अवास्तव खर्चाला विरोधकांनी मात्र प्रचंड विरोध केला आहे. भाजप आमदार संजय केळकर यांनी प्रशासनावर टीका केली आहे. 

50 कोटींमध्ये काय काय केले जाणार?

  • तलावाच्या सुरक्षेसाठी सीसीटिव्हीही कॅमेऱ्याचे जाळे आणि ध्वनीक्षेपण यंत्रणेवर 66 लाख 48 हजार 822 रूपये
  • तलावाच्या सभोवतालच्या संरक्षण भिंतीवर शोभिवंत प्रकाश योजनेचा खर्च 1 कोटी 6 लाख 50 हजार इतका असणार आहे.
  • तर विद्युत पुरवठा, जनित्र, प्रकल्प व्यवस्थापनावर 2 कोटी 21 लाख 71  हजार आणि यंत्रणा चालवण्यासाठी चार वर्षाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी 91 लाख असा 42 कोटी 4  लाख आणि जीएसटीची रक्कम मिळून 49  कोटी 61  लाख रुपयांच्या खर्च केला जाणार आहे. याबाबतच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FPI : गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड सुरुच ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक, जोरदार खरेदी
गुड न्यूज, विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये ट्रेंड कायम ठेवला, भारतीय शेअर बाजारात 16621 कोटींची गुंतवणूक
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
Embed widget