Kalyan News : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे, कल्याणमध्ये संतापजनक प्रकार; भाऊ बहिणी विरोधात गुन्हा दाखल
Kalyan News : भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे.
Kalyan News : कल्याणमध्ये (Kalyan) एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. भाऊ बहिणीने परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे उघडकीस आले आहे. भाऊ अश्लील चाळे करत असताना बहिणीने मोबाईलवर व्हिडिओ बनवला आहे. पीडित मुलीने ही बाब घरी सांगताच तिच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस ठाण्यात या दोन्ही भाऊ-बहिणी विरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली आहे.
पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या घराच्या परिसरात खेळत होती. याच परिसरात आरोपी भाऊ बहिण राहत होते. ही अल्पवयीन मुलगी घराच्या परिसरात खेळत असताना या दोघांची नजर तिच्यावर पडली. आरोपी मुलाने अल्रवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केले. हे अश्लील चाळे सुरु असताना त्याच्या बहीणीने हा किळसवाना प्रकार मोबाईल कॅमेरात कैद केला. या प्रकारामुळं घाबरलेल्या पीडीतेने सर्व हकीकत घरी कुटुंबीयांना सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. कोळशेवाडी पोलिसांनी बहिण भावाविरोधात गुन्हा दाखल करत या दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: