एक्स्प्लोर

खड्डा वाचवायला गेला नी जीवनीशी गेला, दुचाकीस्वाराचा बसच्या चाकाखाली आल्याने मृत्यू

Kalyan Latets News : खड्डे वाचवताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पडलेला दुचाकी स्वार बसच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

Kalyan Latets News : रस्त्यावरील खड्ड्यामुळे एकही जीव जाता कामा नये खड्डे तत्काळ बुजवा अशी सक्त सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आजच दिल्या. त्यानंतर कल्याण डोंबिवलीमधील रस्त्यावरील खड्डे जैसे तसेच आहेत. बदलापूर खोनी रोडवर म्हाडा प्रकल्पासमोर शनिवारी सकाळच्या सुमारास खड्डे वाचवताना खड्ड्यात दुचाकी आदळल्याने पडलेला दुचाकी स्वार बसच्या मागच्या चाकाखाली चिरडला गेल्याने जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. बदलापूर पाईप लाईन रोड हा एम आय डी सी च्या अखत्यारीत येतो, या पावसात खड्ड्यांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे.

एम आय डी सी कडून रस्ते दुरूस्तीचे काम सुरू असले तरी दगड माती डांबराचे ठोकळे टाकून बुजवले जाणारे खड्डे काही तासातच उघडे पडत आहेत. घटना घडल्यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी काँक्रिट टाकून परिसरातील खड्डे बुजवले मात्र एम आय डी सी खड्ड्या बाबत कायम स्वरुपी उपायोजना कधी करणार? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

रस्त्यावरील खड्डे आता त्रासदायक ठरण्याबरोबर जीवघेणे ठरत आहेत. आज सकाळी अंकित थैवा हा तरुण अंबरनाथ वरून घणसोली एमआयडीसीमध्ये नेहमीप्रमाणे आपल्या दुचाकीवरून डकामावर जात होता. खोनीजवळील म्हाडा प्रकल्पासमोर पडलेल्या खड्ड्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने  त्याची दुचाकी आदळली. यामुळे अंकित गाडीवरून रस्त्यावर फेकला गेला. याचवेळी दुर्दैवाने अंकित  दुचाकीवरून उडून बसच्या मागच्या  उजव्या बाजूने येणाऱ्या केडीएमटीच्या  बसवर आदळून चाकाखाली  फेकला गेला. या गंभीर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान याप्रकरणी मानपाडा पोलीसानी अंकितच्या वडिलांच्या तक्रारी वरून केडीएमटी बसचालका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेनंतर शहरातील आणि एमएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीतील रस्त्यावरील खड्ड्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर खड्ड्याससाठी जबाबदार असलेल्या प्रशासनाला मोकळे सोडत, चालकांवर दोष ठेवल्याने  आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे. 

महत्वाच्या बातम्या
Eknath Shinde : रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची यंत्रणा 24 तास सुरु ठेवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget