एक्स्प्लोर

Dombivli News : सलग 61 दिवस 42 किमी धावणाऱ्या डोंबिवलीकर विशाक स्वामीची विश्वविक्रमाला गवसणी

Dombivli News : सलग 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावणाऱ्या डोंबिवलीकर विशाक स्वामीने आज सकाळी आठ वाजता विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Dombivli News : सलग 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावणाऱ्या डोंबिवलीकर विशाक स्वामीने आज (31 ऑक्टोबर) सकाळी आठ वाजता विश्वविक्रमाला (World Record) गवसणी घातली आहे. या आधी सलग 60 दिवस 42 किमी धावण्याचा विक्रम एका भारतीयाच्या नावावर होता. आता हा विक्रम विशाकने मोडत आपल्या नावावर नवा विक्रम नोंदवला आहे. त्याच्या या मेहनतीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने (Guinness World Records) घेतली आहे. आज विशाकने विश्वविक्रमाला गवसणी घातल्यांनंतर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त, डोंबिवलीमधील विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनीधींनी त्याचे कौतुक केले.

विशाक स्वामी हा 29 वर्षीय तरुण डोंबिवलीतील स्टार कॉलनीमध्ये आपली आई, वडील आणि बहिणीसह राहतो. विशाक हा मूळचा केरळचा आहे मात्र त्याचं कुटुंब नोकरीधंद्यानिमित्त डोंबिवलीत स्थायिक झाले आहे. विशाक एका खाजगी विमा कंपनीत काम करतो. त्याची कंपनी बंगलोरला असल्याने तो सध्या वर्क फ्रॉम होम करत आहे. सात वर्षापूर्वी विशाकला धावण्याची आवड निर्माण झाली. विशाकने धावणे सुरु केले. अनेक स्पर्धेत भाग घेत त्याने त्या स्पर्धा जिंकल्या. विशाकला त्याच्या आई आणि बहिणीचा देखील पाठिंबा मिळत होता. 

Dombivli News : सलग 61 दिवस 42 किमी धावणाऱ्या डोंबिवलीकर विशाक स्वामीची विश्वविक्रमाला गवसणी

61 दिवस 42 किमी धावून विश्वविक्रमाला गवसणी 
याच दरम्यान कॅन्सर जनजागृतीसाठी धावणाऱ्या कॅनडामधील टेरीफॉक्स या इसमाची कथा त्याने ऐकली. त्याचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून लोकांमध्ये धावण्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी विशाकने आपले धावणे सुरुच ठेवले. सलग 21  दिवस दररोज 21 किलोमीटर धावण्याचा विक्रम देखील विशाकच्या नावावर आहे. हा विश्वविक्रम केल्यानंतर तो थांबला नाही. त्याने 61 दिवसांचा विश्वविक्रम करण्याचा जिद्द ठेवली. डोंबिवली पूर्वेकडील क्रीडा संकुलात त्याने 1 सप्टेंबरपासून पुन्हा धावणे सुरु केले. दररोज पहाटे तीन वाजता विशाक डोंबिवली क्रीडा संकुल गाठायचा आणि धावणे सुरु करायचा. तीन वाजल्यापासून सुरु झालेलं त्याचे धावणे आठ वाजेपर्यंत सुरुच असायचे. सलग पाच तास न थांबता विशाक धावत होता. विशाक 42 किलोमीटर धावत होता. सतत 61 दिवस दररोज 42 किलोमीटर धावून त्याने या विश्वविक्रमाला देखील गवसणी आज घातली. त्याला धावताना पाहून अनेक डोंबिवलीकरांना प्रश्न पडायचा की हा नेमका इतका का धावतोय. काही दिवसांनी त्याच्या धावण्याचे कारण समजताच डोंबिवलीकरांनी देखील त्याला प्रोत्साहन दिलं. 

विश्वविक्रमानंतर ढोलताशांच्या गजरात स्वागत
आज 61 व्या दिवशी त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला. विश्वविक्रमाला गवसणी घालताच डोंबिवलीकरांनी ढोलताशांच्या गजरात त्याचे स्वागत केले. त्यानंतर डोंबिवली शहरातील विविध सामाजिक संस्था, शिंदे गट उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, काँग्रेसचे संतोष केणे यांच्यासह राजकारणी मंडळी तसेच महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी देखील विशाकची भेट घेत त्याचा कौतुक केलं, त्याचा सत्कार केला. यावेळी विशाकने पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. माझे धावणे पुढे सुरु ठेवणार असल्याचे विशाकने यावेळी सांगितले. 61 दिवस झाले आता शंभर दिवसापर्यंत मी धावणार असल्याचे आत्मविश्वास विशाकने बोलून दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
हायकोर्टाच्या लिपिक पदाच्या परीक्षेत गडबड, परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ; विद्यार्थ्यांचा ठिय्या, पोलीस घटनास्थळी
Nitesh Rane Thnae: 'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
'मुंब्रा नव्हे, मुंब्रादेवी म्हणा; हा देश हिंदूराष्ट्र, कोणाच्या अब्बाचा पाकिस्तान नाही'; ठाण्यातील कावड यात्रेत मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
वीजचोरांना महावितरणचा दणका! 30 कोटी 36 लाख रुपयांची चोरी उघड, कोणत्या विभागात किती वीजचोऱ्या?
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवसात काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
Prashant Kishor : आता सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्यावर केस करावी, प्रशांत किशोर यांची वंदे मातरमच्या वादावर भूमिका  
सरकारनं कायदा केलाय, ...तर भाजपनं भाषणबाजी करण्याऐवजी सोनिया गांधी यांच्या केस करावी : प्रशांत किशोर
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार

Embed widget