एक्स्प्लोर

Thane News : ठाण्यात अल्पवयीन मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना उडवलं! चालकाचा मृत्यू, तर 2 जण जखमी

Thane Accident News : ठाण्यात एका 15 वर्षांच्या मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना धडक (Accident News) दिली. यात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या रिक्षातील 2 जण जखमी झाले आहेत.

ठाणे: ठाण्यात एका 15 वर्षांच्या मुलाने भरधाव टेम्पो चालवत 2 रिक्षांना धडक (Accident News) दिली. यात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून दुसऱ्या रिक्षातील 2 जण जखमी झाले आहेत. ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील आनंद नगर परिसरात सोमवारी पहाटे पावणेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात 15 वर्षांचा एक अल्पवयीन मुलगा भरधाव वेगात पिकअप टेम्पो घेऊन निघाला असताना त्याने 2 रिक्षांना धडक दिली आणि नंतर रस्त्याच्या कडेला मेट्रोसाठी खोदलेल्या खड्ड्यात त्याचा टेम्पो जाऊन पडला. 

त्यामुळे हा अल्पवयीन चालक देखील किरकोळ जखमी झाला. मात्र त्याने रिक्षांना दिलेली धडक इतकी जोरदार होती, की त्यात एका रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून या अपघाताप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी अल्पवयीन टेम्पो चालकासह त्याच्या वडिलांनाही ताब्यात घेतल्याची माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली आहे.

टोरेस घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, ठाणे पोलीसही अ‍ॅक्शन मोडवर

टोरेस घोटाळा प्रकरणी एकीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरु आहे. दुसरीकडे ठाणे पोलिसांनी देखील कारवाई सुरु केली आहे. भाईंदरमधील टोरेस कार्यालयाशी संबंधित तिघांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या तिघांना पोलीस स्टेशनला हजर केलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दुसरीकडे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून अजूनही छापेमारी सुरु असल्याचं पाहायला मिळतं. 

भाईंदर कार्यालयातील तिघांना अटक

भाईंदर येथील टोरेस कार्यालयात काम करणाऱ्या कॅशियर, मॅनेजर आणि  ऑफिस भाड्याने जिच्या नावावर घेतले होते त्या महिलेला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. पोलिसांनी अटक करुन त्यांना ठाणे कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांनी लक्ष्मी सुरेश यादव वय वर्ष 23,  राहणार ताडदेव फिश मार्केट, नितीन रमेश लखवानी वय वर्ष 47, राहणार खारोडी मालाड आणि  मोहम्मद मोईजुद्दीन नझरुद्दीन खालिद शेख वय वर्ष 50, राहणार पूनम सागर मीरा रोड या तिघांना   नवघर पोलिसानी अटक केली आहे.

टोरेसनं गेल्या वर्षी म्हणजेच फेब्रुवारी 2024 मध्ये दादरमध्ये पहिलं कार्यालय उघडलं होतं. त्यानंतर , गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोड मध्ये देखील कार्यालयं उघडली होती.

व्हीडीओ गेम पार्लरच्या जुगारावर कारवाई, गेम पार्लरचे साहित्य जप्त

वर्ध्याच्या हिंगणघाट येथे पोलिसांनी विडीओ गेम पार्लरवर छापा टाकत कारवाई केली आहे. हिंगणघाट शहरात सरकारी दवाखाना चौकात टीनाचे शटरच्या दुकानात इलेक्ट्रानीक कॉइन मशीनने जुगार खेळला जायचा. गुप्त माहितीवरून पोलिसांनी छापा टाकलाय. यात जुगार खेळताना रंगेहात आढळून आल्याने पाच जणांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत इलेक्ट्रॉनिक कॉईन मशीन, नगदी 3250 रूपये व मोबाईल असा एकूण 1 लाख 44 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh Beed Protest:मनोज जरांगेंच्या विनंतीला प्रतिसाद, धनंजय देशमुख टाकीवरुन खाली उतरलेDhananjay Deshmukh Beed Protest : धनंजय देशमुख यांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन; मनोज जरांगे आंदोलनस्थळी दाखल100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
उद्विग्न धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त
धनंजय देशमुख आत्महत्येला प्रवृत्त होतात, याला कारण समस्त "आकां" चे सरताज देवेंद्र फडणवीसजी; सुषमा अंधारेंची शेलक्या शब्दात टीका
Santosh Deshmukh : मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये  महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
मुख्य सूत्रधार मोकाट, त्याला मोक्का का नाही? पोलिसांची भूमिका संशयास्पद; मस्साजोगमध्ये महिलांनी बीड एसपींच्या अंगावर बांगड्या फेकल्या
Yohan Poonawalla : ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
ना अदानी, ना अंबानी! तब्बल 22 रोल्स रॉयस एकट्याच्या ताफ्यात ठेवणारा 'भारताचा रोल्स-रॉयस किंग' माहीत आहे का?
Sick Leave : सावधान... आजारी असल्याचं सांगून सुट्टी घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट, कंपन्यांकडून डिटेक्टिव्ह एजन्सीची नेमणूक
वैद्यकीय रजा घेणाऱ्यांमागं खासगी कंपन्यांकडून गुप्तहेर, नेमकं काय घडलं? कुणी घेतली अनोखी सेवा
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
तब्बल 60 लाख लाडक्या बहिणी बाद ठरणार, राऊतांचा दावा, तुमचंही नाव बाद होणार?
Beed News: धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
धनंजय मुंडे-वाल्मिक कराडांची सह्याद्रीवर डील, नोटा मोजतानाचे फोटो; धनुभाऊंनी राजीनामा दिलाच पाहिजे: संदीप क्षीरसागर
INDIA Alliance Controversy : भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
भाजपला 240 वर आणणाऱ्या महाविकास अन् देशात इंडिया आघाडीला अखेरची घरघर? तीन कारणे अन् तीन नेत्यांच्या थेट वक्तव्यांनी भूवया उंचावल्या
Embed widget