एक्स्प्लोर

Sheezan Khan : अखेर 70 दिवसांनतर शिझान खानची तुरुंगातून सुटका, तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात होता अटकेत

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) तुरुंगातून सुटका झाली आहे.

Tunisha Sharma Suicide Case Sheezan Khan Bail : तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या शिझान खानची (Sheezan Khan) आज ठाणे कारागृहातून सुटका झाली आहे. शिझान गेल्या 70 दिवसांपासून तुरुंगात होता.  24 डिसेंबर रोजी अभिनेत्री तुनिषा शर्माने नायगावमध्ये मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. त्यानंतर तुनिषाची आई वनिता शर्माने शिझानवर गुन्हा दाखल केला होता. 

शिझानची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय भावूक झाले होते. शिझानला घ्यायला त्याची बहिण फलक नाज (Falaq Naaz) आणि शफक नाज (Shafaq Naaz) गेले होते. भावाची सुटका झाल्याने बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

एक लाखाच्या सिक्युरिटी बॉन्डवर शिझानचा जामीन मंजूर करण्यात आला आहे. शिझानच्या वकिलांनी 20 फेब्रुवारीला वसई सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. जामीनासाठी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील अर्ज केला होता. तुनिषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली शिझानला 25 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

नेमकं प्रकरण काय? 

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री तुनिषा शर्माने मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. आत्महत्येला तिचा मित्र शिझान खान जबाबदार असल्याची तक्रार तिच्या आईने वालीव पोलीस स्थानकात केली. त्यानंतर वसई पोलिसांनी शिझानला ताब्यात घेतलं. 

तुनिषा आणि शिझान 'अलिबाबा दास्तान-ए-काबुल' ही मालिका करत होते. या मालिकेच्या शूटिंगदरम्यान ते रिलेशनमध्ये आले. पण काही कारणाने त्यांचा ब्रेकअप झाला. ब्रेकअपनंतर तुनिषाने गळफास घेत आयुष्य संपवलं. तुनिषाच्या आत्महत्येनंतर मालिकेतील कलाकारांसह चाहत्यांना मोठा धक्का बसला. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर शिझानवर अनेक आरोप लावण्यात आले होते.

शिझान खान कोण आहे? (Who is Sheezan Khan) 

शिझान खानचा जन्म 9 सप्टेंबर 1994 रोजी मुंबईत झाला. मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतलेला शिझान अभिनेता आणि मॉडेल आहे. शिझानला बालपणापासूनच अभिनयाची आवड लागल्याने त्याने हेच करिअर निवडलं. 'जोधा अकबर' (Jodha Akbar) या मालिकेच्या माध्यमातून त्याने मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याने 'अलीबाबा : दास्ताने ए कुबुल' (Ali Baba : Dastaan - E - Kabul) या मालिकेमध्ये देखील काम केलं होतं. या मालिकेत तुनिषाने देखील प्रमुख भूमिका साकारली.

संबंधित बातम्या

Sheezan Khan : तुनिषा शर्मा आत्महत्येप्रकरणी शिझान खानला दिलासा; जामीन मंजूर, 2 महिने अन् 10 दिवसांनी तुरुंगातून सुटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Bhavesh Bhinde : अपक्ष उमेदवार ते आरोपी, घाटकोपर  दुर्घटनेतील भावेश भिंडे नेमका कोण?Eknath Shinde Majha Vision Full : खोके ते कंटेनर, कसाब ते मुसा! शिदेंनी ठाकरेंना सर्व बाजूने घेरलंGhatkopar Hoarding Accident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेला 24 तास, बचावकार्य अजूनही सुरुच!Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
काय सांगता? नवऱ्याने 5 रुपयाचे कुरकुरे आणले नाहीत, म्हणून पत्नीचं धक्कादायक पाऊल
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
पोरेल-स्टब्सची वादळी अर्धशतकं, दिल्लीचं लखनौसमोर 209 धावांचं आव्हान
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
Embed widget