एक्स्प्लोर

जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट, किंमत तब्बल...

'F1' हा नंबर आता स्टेटस बनला आहे. मर्सिडिज-मॅक्लेरेन एसएलआर, कस्टम रेन्ज रोव्हर आणि बुगाटी वेरॉन यांसारख्या कारवर ही नंबर प्लेट लावली जाते.

लंडन : भारतात एखाद्या व्यक्तीने एक लाख किंवा पाच लाखांची नंबर प्लेट खरेदी केली तर ती मोठी बाब समजली जाते. आपल्या कारची नंबर प्लेट स्पेशल आणि हटके असावी यासाठी लोक यापेक्षाही जास्त पैसे खर्च करण्यासाठी तयार असतात. पण परदेशात कारच्या व्हीआयपी नंबर प्लेटचा विषय आला तर ही रक्कम एवढी मोठी असते की, आपण त्याचा विचारही करु शकत नाही. युनायटेड किंग्डममध्ये 'F1' हा नंबर अधिकृतरित्या विकण्यासाठी ठेवला असून त्याची किंमत 14 मिलियन पौंड म्हणजेच तब्बल 132 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. ही नंबर प्लेट जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट असल्याचं म्हटलं जात आहे. 'F1' हा नंबर आता स्टेटस बनला आहे. मर्सिडिज-मॅक्लेरेन एसएलआर, कस्टम रेन्ज रोव्हर आणि बुगाटी वेरॉन यांसारख्या कारवर ही नंबर प्लेट लावली जाते. याआधी 2008 मध्ये चार कोटी रुपयांत ह्या नंबर प्लेटची विक्री झाली होती. तर 1904 पासून ह्या नंबर प्लेटचा हक्क अॅक्सेस सिटी काऊन्सिलकडे होता. सध्या F1 नंबरच्या या प्लेटचा हक्क अफझल खान यांच्याकडे आहे. अफझल खान हे कस्टमाईज्ड वाहनं बनवणारी 'खान डिझाईन' या कंपनीचे मालक आहेत. 'फॉर्म्युला वन'चा शॉर्टफॉम 'F1' होतो.  युनायटेड किंग्डमपासून जगभरात असा नंबर असलेली ही प्लेट फारच लोकप्रिय आहे. ही नंबर प्लेट महाग असण्याचं कारण म्हणजे याची केवळ दोन अक्षरं. जर ह्या नंबर प्लेटची विक्री झाली तर ती जगातील सर्वात महागडी नंबर प्लेट ठरेल. आतापर्यंत हा विक्रम दुबईत विक्री झालेल्या  'D5' प्लेटच्या नावावर आहे. ह्या नंबर प्लेटची विक्री 67 कोटी रुपयांत झाली होती. महत्त्वाचं म्हणजे भारताचे बलविंद साहनी यांनी ही नंबर प्लेट खरेदी केली होती. एवढं असूनही भारतात अजूनही कस्टमाईज्ड नंबर प्लेटची कोणतीही तरतूद नाही. तुम्ही थेट आरटीओमधून विशेष नंबरची कोणतीही प्लेट खरेदी करु शकता. दुचाकींसाठी पाच हजार रुपयांपासून 50 हजार रुपयांच्या रेंजमध्ये नंबर प्लेट उपलब्ध आहे. तर चारचाकींसाठी ही रेंज 15 हजार रुपयांपासून एक लाख रुपयांपर्यंत आहे. जर ग्राहक जास्तीत जास्त रक्कम देण्यासाठी तयार असेल, तर अशावेळी बोली लावली जाते.

महत्त्वाच्या बातम्या

Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget