एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WhatsAppवरील 'या' मेसेज लिंकवर चुकूनही क्लिक करु नका!
मुंबई: व्हॉट्सअॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय अॅप असून जगभरात याचे अब्जावधी यूजर्स आहेत. त्यामुळे फक्त चॅटींग करणं एवढ्यापुरता आता व्हॉट्सअॅप मर्यादित राहिलेलं नाही. यात अनेक डाक्युमेंटही आजकाल अनेकजण शेअर करतात.
पण गेल्या काही दिवसापासून व्हॉट्सअॅपवर एक मेसेज फिरतो आहे. 'तुमचं व्हॉट्सअॅपचं सब्सक्रीप्शन संपलं आहे, तुमचं अकाउंट व्हेरिफाय करुन आयुष्यभरासाठी याचं सब्सक्रीप्शन 0.99 पाउंडमध्ये खरेदी करा.' यासोबतच तुम्हाला एक लिंक दिलेली आहे.
मात्र, या लिंकवर चुकूनही क्लिक करु नका. हा एक व्हायरस आहे. यावर क्लिक केल्यानंतर हॅकर्सकडे तुमचा संपूर्ण पर्सनल डेटा जातो. असं झाल्यास तुमच्या बँक आणि पेमेंट डिटेलसह सर्वच पर्सनल डेटाही चोरी होण्याची शक्यता आहे. व्हॉट्सअॅप यूजर्स ट्विटरच्या माध्यमातून याबाबत सावध करत आहेत. या ट्विटमध्ये सल्ला देण्यात आला आहे की, असा मेसेज आल्यास तात्काळ डिलीट करा. त्या लिंकवर अजिबात क्लिक करु नका. नुकताच JUDY या मालवेअरनं अँड्रॉईड डिव्हाईसमध्ये शिरकाव केला होता. यानंतर गुगलनं आपल्या प्ले स्टोअरमधून जवळजवळ 40 हून अधिक अॅप हटवले आहेत. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याविषयी योग्य माहिती जाणून घ्या. संबंधित बातम्या: अँड्रॉईड डिव्हाईसला Judy मालवेअरचा धोका, 3.6 कोटी यूजर्सला फटकाScam alert: If you get this #WhatsApp message, delete it immediately! https://t.co/JN7170dX6L Pic via @MetroUK #cybercrime pic.twitter.com/pJpKaQd74G
— Align (@alignitadvisor) May 31, 2017
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement