एक्स्प्लोर

जिओची ‘धन धना धन’ ऑफर नेमकी काय आहे?

मुंबई : ट्रायच्या आदेशानंतर रिलायन्स जओने समर सरप्राईज ऑफर मागे घेतली. मात्र, ‘धन धना धन’ नावाची समर सरप्राईजसारखीच नवी ऑफर लॉन्च केली. समर सरप्राईज ऑफरचा ज्यांना लाभ घेता आला नाही, त्यांच्यासाठी खास जिओने ही ऑफर आणली आहे. ज्यांनी समर सरप्राईज ऑफर घेतली आहे, ते यूजर्स मात्र ही ऑफर घेऊ शकणार नाही. एक ऑफर... दोन वेगवेगळे रिचार्ज ! धन धना धन ऑफर दोन वेगवेगळ्या प्रकारात विभागली आहे. जे आधीपासूनच जिओचे प्राईम मेंबर आहेत, त्यांच्यासाठी वेगळा रिचार्ज आणि जे प्राईम मेंबर नाहीत किंवा नव्याने सिम खरेदी केले आहेत, त्यांच्यासाठी वेगळा रिचार्ज आहे. प्राईम मेंबर असणाऱ्यांना ऑफरचा काय फायदा? जिओ प्राईम मेंबरना धन धना धन ऑफरमधील 309 रुपयांच्या रिचार्जमध्ये तीन महिन्यांसाठी दररोज 1 जीबी 4G डेटा, तर 509 रुपयांच्या रिचार्जमध्ये तीन महिन्यांसाठी दररोज 2 जीबी 4G डेटा मिळेल. या दोन्ही रिचार्जवर तीन महिन्यांसाठी मोफत व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस, जिओ अॅप्स या सुविधाही मिळतील. मोफत डेटा लिमिट संपल्यानंतर नेट स्पीड 128 kbps होईल. नवीन सिम किंवा प्राईम मेंबर नसणाऱ्यांना ऑफरचा काय फायदा? जिओ प्राईम मेंबर नसणाऱ्यां किंवा नवीन जिओ सिम घेतलेल्यांना 99 रुपये अधिकचे मोजावे लागतील. म्हणजेच प्राईम मेंबरना 309 रुपयांना मिळणारी ऑफर, इथे 408 रुपयांना आहे. तर 509 रुपयांची ऑफर 99 रुपये अधिकचे मोजून 608 रुपयांना आहे. शिवाय, मोफत व्हॉईस कॉलिंग, अनलिमिटेड एसएमएस, जिओ अॅप्स या सुविधाही मिळतील. ‘समर सरप्राईज’साठी ‘धन धना धन’ महागडी ऑफर धन धना धन ऑफरमध्ये प्राईम मेंबरना 309 रुपये, 509 रुपये मोजावे लागतील, तर प्राईम मेंबर नसणाऱ्यांना 408 रुपये आणि 608 रुपये मोजावे लागणार आहेत. समर सरप्राईज ऑफरमध्ये हेच प्लॅन 402 रुपये आणि 602 रुपयांना होते.  म्हणजेच धन धना धन ऑफर समर सरप्राईजपेक्षा 6 रुपयांनी महाग आहे. 15 एप्रिलपर्यंत घेता येणार प्राईम मेंबरशीप जिओनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, प्राईम मेंबरशीप घेण्यासाठी 15 एप्रिल ही शेवटची तारीख आहे. पण प्राईम मेंबरशीप घेणाऱ्या यूजर्सना समर सरप्राईज ऑफरचा फायदा मिळणार नाही. पण हे यूजर्स प्राईम मेंबर झाल्यानंतर 303 रुपयांचं रिचार्ज करुन 28 दिवसांपर्यंत दररोज 1 जीबी 4जी डेटा वापरु शकतात. समर सरप्राईज ऑफर काय होती ? 31 मार्चला जिओनं घोषणा केली होती की, ज्यांनी प्राईम मेंबरशीप घेतली आहे त्यांना 30 जूनपर्यंत 1जीबी / 2जीबी फ्री डेटा वापरता येणार होता. ज्यांनी 99 रुपये भरुन प्राईम मेंबरशीप घेतली आणि 303 रुपयांचं रिचार्ज केलं त्यांना ही ऑफर मिळणार होती. सरप्राईज ऑफरमध्ये यूजर्सला पहिल्याप्रमाणे अनलिमिटेड कॉलिंग मिळणार होतं. 15 एप्रिलपर्यंत सरप्राईज ऑफर घेता येत होती. मात्र, TRAI त्याच्यावर बंदी घातली. https://twitter.com/reliancejio/status/851764667949228032

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर

व्हिडीओ

Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report
Pune Payal Zambre Patil Case : आणखी एक हुंडाबळी, कधी मोडणार साखळी? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
मोठी बातमी : गोकुळमध्ये पराभूत शौमिका महाडिक, नवीद मुश्रीफांची एन्ट्री होणार, 4 नव्हे तर शासननियुक्त 5 संचालकांची नेमणूक!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 नोव्हेंबर 2026 | बुधवार
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
शिवसेनेच्या 4 नगरसेवकांच्या अपात्रतेचा प्रस्ताव मंजूर; भाजपा नगरसेवकांच्या बहुमताने झटका, महायुतीत पुन्हा तणाव?
Gold Silver Rate Hike : अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव, सोने आणि चांदीमध्ये तुफान तेजी,चांदी 7775 रुपयांनी महागली, जाणून घ्या IBJA चे नवे दर
अमेरिकेत ट्रम्प यांचा पराभव होताच सोने,चांदीच्या दरात तुफान तेजी, जाणून घ्या IBJA चे नवे दर
धर्मरक्षणासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत समर्पित राहणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
सत्तेपेक्षा सिद्धांत मोठा, अधिकारापेक्षा धर्म आणि कर्तव्य श्रेष्ठ! : एकनाथ शिंदे
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
नाशिक महापालिकेत भाजपचा षटकार, पक्षाकडून एका महिलेसह 6 स्वीकृत नगरसेवकांची निवड; पाहा यादी
Ravindra Dhangekar on Gokul Election : एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
एकनाथ शिंदेंनीही हित जपलं, पण..; सरकारच्या निर्णयावरुन रविंद्र धंगेकर संताप, बंटी पाटलांसोबत 'गोकुळ'च्या आखाड्यात
मोठी बातमी, सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा,75 टक्के अग्निवीरांना 2 वर्षांच्या अतिरिक्त सेवेनंतर संधी मिळणार, केंद्राचा मोठा निर्णय
सर्व अग्निवीरांना सैन्य दलात नोकरी मिळण्याचा मार्ग मोकळा, केंद्राचा अग्निवीर योजनेत मोठा बदल, अश्विनी वैष्णव यांची माहिती
Embed widget