Vivo Smartphone : vivo v25 5g चा टीझर; 'हे' असतील दमदार फिचर्स. वाचा संपूर्ण माहिती
Vivo V25 5G Teaser : Vivo ने Vivo V25 5G भारतात लॉन्च करण्यापूर्वी Vivo V25 5G चा टीझर रिलीज केला आहे.
Vivo V25 5G Teaser : चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Vivo ने Vivo V25 5G लॉन्च करून भारतात आपल्या 5G स्मार्टफोनची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. Vivo V25 मध्ये कलर बदलणारे फ्लोराईट AG ग्लास डिझाईन आणि 8GB RAM असेल. हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्यापूर्वी Vivo ने Vivo V25 5G स्मार्टफोनचे दोन टीझर सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका टीझरवर फ्लिपकार्टच्या वेबपेजची लिंक देण्यात आली आहे. ज्यावरून हे स्पष्ट होते की, हा स्मार्टफोन भारतात फक्त फ्लिपकार्टवर रिलीज केला जाईल.
कंपनीने अद्याप Vivo V25 5G ची किंमत जाहीर केली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, Vivo V25 5G सर्फिंग ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध करून दिला जाईल.
Vivo V25 5G स्मार्टफोनचे तपशील :
Vivo V25 5G लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. चीनी कंपनी Vivo ने याची घोषणा केली आहे. Vivo ने आगामी स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले आहेत. हा स्मार्टफोन 50-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह सुसज्ज असेल, तर मागील पॅनेलमध्ये रंग बदलणारे फ्लोराईट एजी ग्लास डिझाइन असेल. यामध्ये कंपनीचे 'एक्सटेंडेड रॅम' फीचरही दिले जाणार आहे. Vivo वेबसाईटनुसार, स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि MediaTek Dimensity 900 SoC असेल.
Vivo V25 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च केला जाईल. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर ऑप्शनमध्ये येण्याची शक्यता आहे. हा फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असेल. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचमध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील असेल. फोनमध्ये एक्सटेंडेड रॅम फीचर देखील असेल ज्याला 8 जीबी पर्यंत वाढवता येईल.
4,500mAh बॅटरी मिळेल
विवो इंडिया वेबसाइटनुसार, स्मार्टफोनमध्ये 64-मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल ज्यामध्ये 64-मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8-मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर असेल. तसेच, या फोनच्या स्पेसिफिकेशनमध्ये Android 12 आउट-ऑफ-द-बॉक्स, 128GB इनबिल्ट स्टोरेज आणि 44W चार्जिंग सपोर्टसह 4,500mAh बॅटरी असेल.
महत्वाच्या बातम्या :
- Apple Watch Series 8 Launch : अॅपल वॉच 7 आणि अॅपल वॉच 8 सीरीजमध्ये कोण आहे वरचढ? वाचा सविस्तर...
- आता 5G सेवा घेण्यासाठी सिम बदलावा लागणार नाही, जाणून घ्या कसे कराल अपग्रेड