एक्स्प्लोर

व्हॉट्सअॅपवर मुख्यमंत्री बदलाच्या वावड्या

मुंबई : राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. लाखोंच्या संख्येने प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाज रस्त्यावर उतरत आहे. या मोर्चांमध्ये सोशल मीडिया महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मोर्चाचं नियोजन, आयोजन, बैठक आणि प्रत्यक्ष मोर्चा हे सर्व सोशल मीडिया आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून होत आहे. मात्र त्याचवेळी व्हॉट्सअॅपवरुन काही गैरसमजही पसरवले जात आहेत. सध्या व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं पद धोक्यात, मराठा समाजाचा मुख्यमंत्री होण्याच्या हालचालींना वेग' असे अफवा पसरवणारे मेसेज फिरत आहेत. इतकंच नाही तर त्या - त्या जिल्ह्यातील मराठा नेत्याचं नाव घेऊन, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडणार असल्याचंही छातीठोकपणे सांगितलं जात आहे. या मेसेजमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांच्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होणार असल्याचं सूत्रांनी सांगितल्याची अफवाही पसरवली जात आहे. व्हॉट्सअपवर फिरणारे, अफवा पसरवणारे काही मेसेज 1) फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात? मराठा मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मुख्यमंत्री बदलाच्या जोरदार हालचाली. भाजपातील शहा यांच्या निकटवर्तीय मराठा नेत्याने भाजप श्रेष्ठींना दिला अहवाल. गुजरातच्या पाटीदार आंदोलनाप्रमाणे हे आंदोलन चिघळल्यास गुजरात सारखीच महाराष्ट्रात भाजपाची अवस्था होऊ नये, म्हणून अमित शहा यांनी घेतलाय निर्णय़. सर्वच आघाड्यावर नाकाम ठरलेले बोलघेवडे मुख्यमंत्री फडणवीस बदलाचे वारे. मुख्यमंत्रीपदी पंकजा मुंढे हव्यात असा सर्वच नेत्यांचा सूर. मराठा नेतेही राजी ? मुंबईत गुप्त बैठक झाल्याची विश्वसनीय सुत्रांकडून माहिती. ? 2) चंद्रकांतदादा पाटील मुख्यमंत्रीपदी निश्चित. कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाची संधी. असे अफवा पसरवणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
PM Narendra Modi: मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
मोबाईलवर अचानक येणारे इमर्जन्सी मेसेज अन् वाजणारे सायरन आता बंद; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टिम'ला स्थगिती
Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून घ्या कारण
E85 Flex Fuel: 85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार
85 टक्के इथेनॉल मिश्रण असलेले फ्लेक्स फ्युएल सादर; पेट्रोलपेक्षा तब्बल 20 रुपयांनी स्वस्त, 'या' गाड्यांमध्ये चालणार

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा
Embed widget