एक्स्प्लोर

Payal Pawar Zhambre Death Case Pune: आयटी इंजिनिअर आणि अत्यंत शांत स्वभावाच्या पायलने जीवन संपवलं; प्राथमिक कारणाने कुटुंब हादरलं, पुण्यात नेमकं काय घडलं?

Payal Pawar Zhambre Death Case Pune: पुण्यात 29 वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

Payal Pawar Zhambre Death Case Pune: पुण्यात 29 वर्षीय विवाहित महिलेने काल (2 नोव्हेंबर) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आयटी इंजिनिअर पायल पवार-झांबरे (Payal Pawar Death Case Pune) असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. पायल पवार-झांबरे या पुण्यातील नामांकित झांबरे पॅलेसच्या मालकांच्या कुटुंबातील सून असल्याची माहिती आहे. झांबरे कुटुंबीयांच्या त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. या घटनेनंतर पुण्यातील महर्षी नगर परिसरात असलेल्या झांबरे पॅलेस येथे तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पायल पवार झांबरे आत्महत्या प्रकरणी पायलचा पती अक्षय झांबरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पायल यांचे पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहेरून पैसे आणि सोने आणण्याचा तगादा आणि सासरच्या जाचाला कंटाळून पायलने आत्महत्या केल्याचा पवार कुटुंबियांनी आरोप केला आहे. दरम्यान, पायल पवार या पुण्यातील झांबरे पॅलेसचे मालक असलेल्या झांबरे यांची सून आहे. पायल हिच्या मृत्यूनंतर संतप्त झालेल्या पवार कुटुंबीयांच्या सदस्यांकडून झांबरे पॅलेसची तोडफोड करण्यात आली. (Pune Payal Zhambre Marathi News)

पायल ही उच्चशिक्षित आणि अत्यंत शांत स्वभावाची- (Payal Pawar Zhambre Death Case Pune)

पायल पवार झांबरे या विवाहितेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी झांबरे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. पायलने आत्महत्या केली नाही तर तिचा खून झाला असे त्यांचे म्हणणे आहे. पुण्यातील पायल झांबरे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले असून, माहेरच्या कुटुंबीयांनी सासरच्या मंडळींवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. पायल यांच्या सासरच्या लोकांकडून सोनं आणि पैशांसाठी त्यांचा सतत शारीरिक व मानसिक छळ केला जात होता, असा आरोप पायलच्या माहेरच्यांनी केला आहे. पायल या उच्चशिक्षित आणि अत्यंत शांत स्वभावाच्या होत्या, त्या कोणत्याही परिस्थितीत आत्महत्या करू शकत नाहीत, असा ठाम दावा कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे ही आत्महत्या नसून घातपात असण्याची दाट शक्यता वर्तवत, या प्रकरणाची 'हत्या की आत्महत्या' या दोन्ही बाजूंनी सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे. 

नेमकं प्रकरण काय? (Payal Pawar Death Case Pune)

माहेरच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, लग्नापासून पायल यांच्यावर सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. प्रत्येक दिवाळीत 5 ते 10 तोळे सोन्याची मागणी केली जात होती. पायल यांचे कुटुंब शेतकरी असून दुष्काळी परिस्थितीमुळे त्यांनी पुढच्या हंगामापर्यंत वेळ मागितला होता, तरीही त्यांचा छळ सुरूच होता.  वर्ष 2022 मध्ये पायल गर्भवती असताना त्यांना मुलगाच व्हावा यासाठी मानसिक त्रास देण्यात आला. 30 मार्च 2023 रोजी त्यांना मुलगी झाल्यानंतर सासरच्या लोकांनी हॉस्पिटलमध्ये येऊन वाद घातले आणि पायल किंवा बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला होता, असा आरोप पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे. पायल यांचा मृतदेह पुण्याच्या मुकुंदनगरमधील 'अक्षय हाइट्स' सोसायटीतील एका जुन्या फ्लॅटमध्ये गळफास घेतलेल्या स्थितीत आढळला. सकाळी 7 च्या सुमारास सासरच्या मंडळींनी माहेरच्या लोकांना फोन करून पायल घरून निघून गेल्याचे सांगितले; परंतु माहेरचे लोक तिथे पोहोचले तेव्हा पायल मृत अवस्थेत आढळल्या आणि पती अक्षय तसेच त्याचे आई-वडील तिथून पसार झाले होते. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी मृत पायल यांचे पती अक्षय झांबरे, सासू आणि सासरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पती अक्षय झांबरे याला ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. 

संबंधित बातमी:

Pune Payal Zhambre Case : पायल झांबरे प्रकरणी मोठी अपडेट; पती अक्षय झांबरे पोलिसांच्या ताब्यात, माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण! मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई,  हरियाणातील कर्नाल जिल्ह्यातून 22 वर्षीय महिला आरोपीला अटक 
धक्कादायक! प्रेमसंबंधातून तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, तब्बल 52 दिवसानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
धक्कादायक! प्रेमसंबंधातून तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल, तब्बल 52 दिवसानंतर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
Pune Payal Zhambre Case : पायल झांबरे प्रकरणी मोठी अपडेट; पती अक्षय झांबरे पोलिसांच्या ताब्यात, माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप
पायल झांबरे प्रकरणी मोठी अपडेट; पती अक्षय झांबरे पोलिसांच्या ताब्यात, माहेरून पैसे आणि सोने आणण्यासाठी छळ केल्याचा आरोप
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Advertisement

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबरकडून आरोपीला बेड्या
सेंट्रल बँकेच्या खात्यातून 13.96 कोटी RTGS द्वारे लंपास, 107 जणांच्या अंकांटमध्ये जमा; सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या
Amit Shah Vs Rahul Gandhi : 'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
'किमान नकली संसदेत तरी पंतप्रधान व्हा',  अमित शाहांचा राहुल गांधींना टोला; भाजपच्या 'लोकतंत्र बचावो' पदयात्रेत काँग्रेसला झोडपलं
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
पदवीधरच्या निकालानंतर सतीश चव्हाण म्हणाले, माझा घात झाला; अब्दुल सत्तारांनी पुन्हा डिवचलं, शायरीतून टोला
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
सराफ व्यावसायिकाचं भरदिवसा इनोव्हातून अपहरण, सर्वत्र खळबळ; पोलीस तपासात धक्कादायक ट्विस्ट, तेलंगणा कनेक्शन
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
देशाला मोदीजी हवे आहेत, राहुल गांधींना अतिडावी व्यवस्था उभी करायचीय, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल, म्हणाले संविधान वाचवण्यासाठी आम्ही रस्त्यावर 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Imran Khan : OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
OCI कार्डधारक असताना SIR आंदोलनात का गेला? तुमचा आणि भारतातील आंदोलनाचा काय संबंध? इम्रान खानला न्यायालयाने फटकारले
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
जम्मू आणि काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सच्या 25 आमदारांचा सीएम ओमर अब्दुल्लांना 14 दिवसांचा अल्टिमेटम; 'मागण्या मान्य न झाल्यास..'
Embed widget