Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
प्रदूषण करू नका, पर्यावरणाची काळजी घ्या, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा. असे जनजागृती करणारे सामाजिक संदेश अनेकदा आपल्या कानावर पडतात. पण या संदेशांवरून कसा वाद होऊ शकतो, याचं उदाहरण आज मुंबईत दिसलं. त्याचं झालं असं की अभिनेत्री दिया मिर्झाचा जनजागृती करणारा एक संदेश मुंबई महापालिकेनं आपल्या सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित केला. मात्र हा संदेश बघून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा पारा चढला. त्यानंतर काही वेळातच पालिकेच्या हँडलवरून हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला. या प्रकारावरून जोरदार वाद पेटला आणि आरोप-प्रत्यारोपांना ऊत आला. नेमकं काय घडलं, याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट.
मुंबई महानगरपालिकेच्या ट्विटर हँडलवर अपलोड झालेला आणि नंतर डीलिट झालेला हा व्हिडिओ.
अभिनेत्री दिया मिर्झाचा हा संदेश एका मोठ्या वादाचं निमित्त ठरेल, असं हा व्हिडिओ ऐकताना तुम्हाला वाटलं होतं का..
पण दियाचा हा संदेश ऐकून भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचं पित्त चांगलंच खवळलं.
संदेश काय आहे, यापेक्षाही तो कुणी दिलाय, याचा अमित साटमांना जास्त राग आला आणि त्यांनी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर आपली तिडीक व्यक्त केली.
All Shows































