एक्स्प्लोर
'सर्वात फास्ट कॅशियर' अशी खिल्ली उडवलेल्या महिलेचं व्हायरल सत्य
मुंबई : सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल होते, तेव्हा तिची सत्यता पडताळलेली असतेच असं नाही. किंबहुन अर्ध्याहून अधिक वेळा व्हायरल गोष्टींची एकच बाजू प्रकाशात आलेली असते. 'सर्वात जलद कॅशियर' असं उपरोधिक कॅप्शन देत हिणवल्या गेलेल्या महिलेची दुसरी बाजू जाणून न घेताच तिची सोशल मीडियावर बदनामी करण्यात आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुण्यातील शाखेत काम करणाऱ्या प्रेमलता शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 24 ऑक्टोबरला बालराजू सोमीसेट्टी या फेसबुक यूझरने त्या बँकेत संथ गतीने कॅश मोजतानाचा व्हिडिओ शूट केला आणि अपलोड केला. 14 लाख पेक्षा जास्त जणांनी हा व्हिडिओ पाहिला असून दोन लाखांपेक्षा जास्त जणांनी शेअर केला आहे.
कुंदन श्रीवास्तव यांनी प्रेमलता शिंदे यांची खरी कहाणी समोर आणल्याचं वृत्त 'इंडिया टुडे'ने दिलं आहे. शिंदे फेब्रुवारी 2017 मध्ये निवृत्त होणार आहेत. प्रेमलतांना एकदा पॅरलिसीसचा, तर दोन वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला आहे. संबंधित व्हिडिओ शूट करण्यात आला, त्यावेळी नुकत्याच त्या वैद्यकीय चाचण्यांनंतर कामावर रुजू झाल्या होत्या.
अनेक सुट्ट्या उर्वरित असूनही त्यांनी कामावर येणं पसंत केलं. सन्मानाने निवृत्त होण्याचा त्यांचा मानस असल्याने प्रेमलता आजारपण दूर सारुन कामावर आल्या. बँक शाखेतील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार शिंदेंना अतिरिक्त कॅश काऊण्टर देण्यात आलं आहे. त्यामुळे त्या त्यांच्या गतीनुसार काम करु शकतात आणि ग्राहकांचा खोळंबा होत नाही.
पाहा मूळ फेसबुक पोस्ट :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
पुणे
नाशिक
भारत
Advertisement