एक्स्प्लोर

मोदींच्या त्या ट्वीटला सर्वाधिक रिट्विट्स; ट्विटरवरील वर्षभरातील टॉप 10 ट्वीट, हॅशटॅग, व्यक्ती

मायक्रो ब्लॉगिंग साईट असणाऱ्या ट्विटरने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये वर्षभरात भारतातील ट्विटरवर ट्रेन्ड आणि ट्विटरवर लोकप्रियता मिळालेल्या व्यक्तींची यादी प्रकाशित केली आहे.

मुंबई : सध्याच्या सोशल मीडियाच्या युगात फेसबुक आणि ट्विटरसारख्या माध्यमांचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या सोशल नेटवर्किंग साइट्सवर अनेक लोक वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतात. सध्या 2019 वर्षाचा शेवटचा महिना सुरू असून हे वर्ष सरुन नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. अशातच मायक्रो ब्लॉगिंग साईट असणाऱ्या ट्विटरने आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये वर्षभरात भारतातील ट्विटरवर ट्रेन्ड आणि ट्विटरवर लोकप्रियता मिळालेल्या व्यक्तींची यादी प्रकाशित केली आहे. ट्विटर इंडिया (Twitter India) या ट्विटर हॅन्डलवरून ट्वीट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. भारतातील लोकप्रिय ट्विटर हॅन्डल्स 2019 या वर्षात ट्विटरवरील सर्वाधिक लोकप्रिय 10 व्यक्तींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा बाजी मारली असून त्यापाठोपाठ राहुल गांधी यांनाही ट्विपल्सनी पसंती दिली आहे. या दोन्ही नेत्यांच्या ट्विटर हॅन्डलला ट्विपल्सनी अनेकदा टॅग केलं. त्यामुळे या दोन्ही नेत्यांचे अकाउंट्स पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर केंद्रिय गृहमंत्री अमित शाह, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. ट्विटरने यावर्षीच्या अहवालात पुरूष आणि महिला नेत्यांच्या ट्विटर हॅन्डलची वेगवेगळी यादी जाहिर केली आहे. त्यामुळे महिलांच्या यादीनुसार, स्मृती ईरानी पहिल्या क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा आहेत. तसेच मनोरंजन विश्वात अभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांनी आणि अभिनेत्रींमध्ये सोनाक्षी सिन्हाने बाजी मारली आहे. भारतात सर्वाधिक वापरण्यात आलेले हॅशटॅग्स भारतात #loksabhaelections2019 हा हॅशटॅग सर्वात जास्त ट्रेन्ड झाला. त्यापाठोपाठ #chandrayaan2 आणि #cwc19 या हॅशटॅग्सनी हे वर्ष गाजवलं. हे तिनही हॅशटॅग वापरून ट्विपल्सनी अनेक ट्वीट्स केले. यावर्षी अनेक वर्ष सुरू असलेल्या अयोद्धा प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. त्यावेळी #ayodhyaverdict हा हॅशटॅगही ट्रेंन्डमध्ये होता. याव्यतिरिक्त ट्विटरच्या यावर्षीच्या टॉप10 यादीमध्ये #avengersendgame, #article370, #pulwama या हॅशटॅग्सचाही समावेश होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं गोल्डन ट्वीट यंदाच्या वर्षी देशात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपने सलग दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठ शब्दांचं एक ट्वीट केलं होतं. त्याला लोकांनी पसंती दर्शवली. ट्विटर इंडियाने पंतप्रधानांचं हे ट्वीट गोल्डन ट्वीट म्हणून घोषित केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ट्वीटमध्ये लिहिलं होतं की, 'सबका साथ+साथ विकास+सबका विश्वास=विजयी भारत।'. 23 मे रोजी दोन भाषांमध्ये करण्यात आलेलं हे ट्वीट 1.17 लाखपेक्षा जास्त वेळा री-ट्वीट करण्यात आलं असून 4.19 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाईक केलं आहे. त्यापाठोपाठ विराट कोहलीच्या ट्वीटला लोकांनी पसंती दर्शवली आहे. विराट कोहलीने भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंहच्या वाढदिवसानिमित्त एक ट्वीट केलं होतं. त्या ट्वीटला अनेकांनी पसंती दर्शवली आहे. याव्यतिरिक्त तमिळ इंडस्ट्रिमधील 'बिगील' या चित्रपटाचं पोस्टर तमिळ अभिनेता विजय याने #bigil ट्वीट केलं होतं. या ट्वीटला सर्वात जास्त रिट्वीट मिळाले आहेत. दरम्यान, ट्विटरवर वर्षभरात सर्वात जास्त वापरण्यात आलेल्या हॅशटॅग्सच्या यादीत एकाही हिंदी किंवा मराठी हॅशटॅगचा समावेश नाही. मोदींच्या त्या ट्वीटला सर्वाधिक रिट्विट्स; ट्विटरवरील वर्षभरातील टॉप 10 ट्वीट, हॅशटॅग, व्यक्ती वर्षभरात ट्विटरवर सर्वाधिक वापरण्यात आलेले हॅशटॅग्स : #loksabhaelections2019 : जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारतात यंदाच्या वर्षी लोकसभा निवडणुका पार पडल्या. 2014 मध्ये मिळवलेली सत्ता राखण्यात भाजपला यश आलं. त्यानिमित्ताने ट्विटरवर हा हॅशटॅग वापरून अनेक ट्वीट करण्यात आले होते. #chandrayaan2 : इस्त्रोच्या चांद्रयान-2 मिशनची दखल जगभरात घेण्यात आली होती. #cwc19  : 12व्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सेमीफायलमधूनत माघारी परतला. #pulwama : 14 फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. #article370 : जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटवण्यात आलं होतं. #bigil : तमिळ चित्रपटाचं पोस्टर तमिळ अभिनेता विजय याने या हॅशटॅगसह ट्वीट केलं होतं. #diwali : दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण भारतात दिवाळी उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी हा हॅशटॅग ट्रेन्ड करण्यात आला. #avengersendgame : मार्वेल सिरीजमधील बहुचर्चित एवेंजर्स एन्डगेम या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर बाजी मारली. भारतासह संपूर्ण जगभरात प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतंल. #ayodhyaverdict : अनेक वर्ष सुरू असलेल्या अयोद्धा प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. #eidmubarak : ईदनिमित्ता शुभेच्छा देताना ट्विपल्सनी हा हॅशटॅग वापरला होता. राजकीय क्षेत्रात सर्वाधिक टॅग करण्यात आलेले ट्विटर हॅन्डल्स : 1. नरेंद्र मोदी @NarendraModi 2. राहुल गांधी @RahulGandhi 3. अमित शाह @AmitShah 4. अरविंद केजरीवाल @ArvindKejriwal 5. योगी आदित्यनाथ @myogiadityanath 6. पीयूष गोयल @PiyushGoyal 7. राजनाथ सिंह @rajnathsingh 8. अखिलेश यादव @yadavakhilesh 9. गौतम गंभीर @GautamGambhir 10. नितिन गडकरी @nitin_gadkari मोदींच्या त्या ट्वीटला सर्वाधिक रिट्विट्स; ट्विटरवरील वर्षभरातील टॉप 10 ट्वीट, हॅशटॅग, व्यक्ती दरम्यान, ट्विटरवर यावर्षात काही इमोजीही ट्रेन्ड झाले. ट्विटरने त्यांचीही एक यादी जाहिर केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 80 at 8AM Superfast 15 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याMajha Gaon Majha Jilha at 730AM 15 January 2025 माझं गाव, माझा जिल्हाABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 15 January 2025 सकाळी 8 च्या हेडलाईन्सABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 15 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil: जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
जयंत पाटलांच्या साम्राज्याला तडे, मामाच्या मनमानीला कंटाळून भाचे भाजपच्या वाटेवर; शेकापमधील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर!
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
लग्न चार दिवसांवर अन् पोटच्या लेकीला बापानं गोळ्या घालून ठार केलं, दोन दिवसांपूर्वीच व्हिडिओ शेअर करत मुलगी म्हणाली होती...
Umraga Vidhansabha Pravin Swami: ठाकरे गटाचे उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामींचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकीवर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या आमदाराचं जात प्रमाणपत्र बनावट? आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता
Dhananjay Munde: धनंजय मुंडेंना PM मोदींच्या बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोदी महायुतीच्या आमदारांना भेटणार, पण धनंजय मुंडेंना बैठकीपासून दूर ठेवण्यासाठी परळीत पाठवलं?
PSU Banks : केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
केंद्र सरकार पैसा उभा करण्यासाठी 5 सार्वजनिक बँकांमधील भागिदारी विकणार? अपडेट येताच शेअरमध्ये तेजी
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
अरबी समुद्रात चक्राकार वारे, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात अवकाळी  पावसाची शक्यता , वाचा IMD चा अंदाज
Bhaskar Jadhav : शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
शिवसेनेची काँग्रेस झाली, भास्कर जाधवांची खदखद बाहेर; सेनेत धुसफूस, ठाकरे काय निर्णय घेणार? 
India Open 2025 Badminton : पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
पीव्ही सिंधू, किरण जॉर्ज, ध्रुव-तनिषा दुसऱ्या फेरीत; चीनच्या पाचव्या मानांकित ली शी फेंगचा पराभव 
Embed widget