एक्स्प्लोर

स्कोडा रॅपिड फेसलिफ्ट लॉन्च, नव्या फीचर्ससह नवा लूक

मुंबई : स्कोडाने रॅपिड सेडानचं फेसलिफ्ट मॉ़डेल लॉन्च केलं आहे. या कारची किंमत 8 लाख 34 हजार रुपयांपासून सुरुवात होते, ते 12 लाख 67 हजार रुपयांपर्यंत आहे. ह्युंदाई वर्ना, होंडा सिटी, फॉक्सवेगन वेंटो आणि मारुती सुझुकी सियाज यांसारख्या कारना स्कोडा रॅपिड फेसलिफ्टची स्पर्धा असेल. डिझाईन रॅपिड फेसलिफ्टला फॉक्सवेगन वेंटोच्या प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात आले आहे. डिझाईनच्या बाबतीत अत्यंत शार्प आणि आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. स्कोडा ऑक्टाव्हिया आणि स्कोडा सुपर्ब यांच्या डिझाईनचाही थोडा स्पर्श रॅपिड फेसलिफ्टला झालेला आहे. मात्र, या कारच्या पुढील भागात अनेक बदल करण्यात आले आहेत. ग्रिल, प्रोजेक्टर हेडलँप्स आणि डे-टाईम रनिंग लाईट अत्यंत नव्या लूकमध्ये दिसतील. एअर डॅमवर हनीकॉम्ब डिझाईनचा वापर करण्यात आला आहे. बाजूंना नवे अलॉय व्हिल्स लावण्यात आले आहेत. तर मागील बाजूस फार काही बदल करण्यात आले नाहीत. मात्र, टेललॅम्प्स, बंपर, विंग मिररसोबत इंडिकेटर आणि मजबूत एंटिना इत्यादी देण्यात आले आहे. केबिन सध्याच्या रॅपिडसाखंच केबिन आहे. यामध्ये बेज-ब्लॅक कलरच्या थीमचा वापर करण्यात आले आहे. काही ठिकाणी ब्राऊन-बेज कलरचं कॉम्बिनेशनही पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या कारमध्ये पुढील बाजूस हाईट अॅडजस्टेबल सीट, टिल्ट आणि टेलिस्कॉपिक अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हिल, सेंट्रल आर्मरेस्ट, टचस्क्रीन ऑडिओ सिस्टमसोबतच मिररलिंक, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वन-टच डाऊन ऑल पॉवर विंडो यांसारखे फीचर्स आहे. याशिवाय कारमध्ये मल्टी-इंर्फोमेशन डिस्प्ले देण्यात आला असून, मायलेजसोबत स्पीडची माहितीही मिळेल. इंजिन पॉवर स्पेसिफिकेशनबाबतही स्कोडा रॅपिड फेसलिफ्टमध्ये विशेष बदल करण्यात आले आहेत. पेट्रोल आण डिझेल असे दोन्ही व्हेरिएंट उपलब्ध असतील. डिझेल व्हेरिएंटमध्ये 1.5 लीटरचं टर्बो चार्ज्ड इंजिन असेल, जो 110 पीएस पॉवर आणि 250 एनएम टॉर्क देईल. पेट्रोल व्हेरिएंटमध्ये 1.6 लीटर इंजिन असेल, जो 105 पीएस पॉवर आणि 153 एनएम टॉर्क देईल. दोन्ही इंजिनसोबत 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स स्टँडर असतील.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 1 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lakshman Hake: 'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
'जीवे मारण्याचा प्रयत्न?' हाकेंचा दावा, ससूण रुग्णालयासमोर मध्यरात्री मराठा ओबीसी कार्यकर्त्यांचा गोंधळ
Pune Crime : बारामतीमधील खून प्रकरणानंतर गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
गोळीबाराच्या घटनेनं इंदापूर हादरलं, पोलिसांनी यंत्रणा कामाला लावली, 2 तासात आरोपीला ठोकल्या बेड्या
Horoscope Today 01 October 2024 : आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
आज 'या' राशींवर राहणार बाप्पाची कृपा; मोठं टेन्शन होणार दूर, वाचा सर्व राशींचे आजचे राशीभविष्य
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
अविमुक्तेश्वर महाराजांकडून स्तुतीसुमने, हाती धनुष्यबाण; सांगितला CM चा वेगळाच लाँग फॉर्म
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढून आमदार होऊन दाखवावे; भाजपचं चॅलेंज, फडणवीसांचा दिला दाखला
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्याचे; नशीब सोन्यासारखं उजळणार, होणार अपार धनलाभ
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
एका दिवसात नाही, तासाभरातच 3 रेकॉर्ड; भारताची तुफानी फलंदाजी, सर्वात जलद 50, 100, 150
Embed widget