एक्स्प्लोर
ड्युअल फ्रंट कॅमेरासह VIVO V5 प्लस भारतात लाँच
नवी दिल्ली : VIVO ने भारतात VIVO V5 प्लस हा स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनची किंमत 27 हजार 980 रुपये ठेवण्यात आली असून ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर हा फोन खरेदी करता येऊ शकतो. या फोनची प्री-बुकिंग 24 जानेवारीपासून, तर विक्री 1 फेब्रुवारीपासून होईल.
ड्युअल फ्रंट कॅमेरा ही VIVO V5 प्लसची विशेषता आहे. 20 मेगापिक्सेल आणि 8 मेगापिक्सेलचे दोन फ्रंट कॅमेरे या फोनमध्ये देण्यात आले आहेत. त्यामुळे सेल्फीप्रेमींसाठी हा फोन एक पर्वणी ठरु शकतो. काही दिवसांपर्वी लाँच झालेल्या VIVO V5 या फोनचं हे अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनमध्येही 20 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.
VIVO V5 प्लसचे फीचर्स :
5.5 इंच आकाराची स्क्रीन
20 मेगापिक्सल ड्युअल फ्रंट कॅमेरा
16 मेगापिक्सल रिअर कॅमेरा
3160 mAh क्षमतेची बॅटरी
4 GB रॅम, 64 GB इंटर्नल स्टोरेज
अँड्रॉईड 6.0 सिस्टीम
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement