एक्स्प्लोर
सॅमसंगच्या बहुप्रतीक्षित ‘गॅलेक्सी नोट 7’चे फोटो लीक
मुंबई : सॅमसंगने नव्या गॅलेक्सी फॅबलेट ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला लॉन्च करण्याची शक्यता आहे. हे फॅबलेट नोट 6 नव्हे, तर नोट 7 असेल, अशी माहिती मिळते आहे. ‘ऑनलिक्स’ या लीकस्टरने सॅमसंगच्या या आगामी गॅलेक्सी नोट 7 चे 3D रेन्डर फोटो लीक केले आहेत. https://twitter.com/OnLeaks/status/738673994765832192 काही दिवसांपूर्वीच गॅलेक्सी S7 सारखंच आगामी गॅलेक्सी नोट 7 असणार आहे. या नव्या फॅबलेटला दोन्ही बाजूंनी कव्हर्ड ग्लास असेल. थोडा बदल म्हणून S पेनला डिव्हाईसच्या खालील बाजूस स्लॉट देण्यात आलं आहे. या फोनमध्ये टाईप-सी पोर्ट असून, रेंडरमध्ये ड्यअल कॅमेरा सेटअप आहे. फीचर्स:
- एचडी डिस्प्ले
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 823 प्रोसेसर
- हाय क्लॉक स्पीड
- 153×745.x7.8mm डायमेन्शन
- 6 जीबी रॅम
- 256 जीबी स्टोरेज क्षमता
- 6 4,200mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा























