एक्स्प्लोर
अखेर सॅमसंग गॅलक्सी नोट 8 च्या लाँचिंगचा मुहूर्त ठरला?

प्रातिनिधीक फोटो
मुंबई : सॅमसंगचा गॅलक्सी नोट 8 हा फॅबलेट फ्लॅगशीप स्मार्टफोन पुढच्या महिन्यात लाँच होणार असल्याची माहिती आहे. हा स्मार्टफोन 23 ऑगस्ट रोजी लाँच होणार असल्याचं वृत्त दक्षिण कोरियातील एका वृत्तपत्राने दिलं आहे. ऑगस्ट महिन्यात हा स्मार्टफोन लाँच होईल, असंही काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे. मात्र फोन ऑगस्टमध्ये लाँच होणार असला तरी सॅमसंगच्या अधिकाऱ्यांनी 23 तारीख निश्चित झाल्याचं वृत्त फेटाळलं आहे. सॅमसंग हा स्मार्टफोन सप्टेंबर अखेरपर्यंत जगभरात उपलब्ध करुन देण्याच्या तयारीत आहे. कारण सप्टेंबरमध्ये लाँच होणाऱ्या आयफोन 8 सोबत नोट 8 ची टक्कर होणार होईल. दरम्यान सॅमसंग या फोनची उत्पादन 20 टक्क्यांनी कमी करणार असल्याचंही वृत्त आहे. लाँचिंगच्या पहिल्या दोन महिन्यात या फोनचे 98 लाख यूनिट विक्री करण्याचं लक्ष्य कंपनीने ठेवलं आहे. जे गेल्या वर्षी लाँच झालेल्या नोट 7 पेक्षा 20 टक्क्यांनी कमी आहे. विक्रीचं कमी लक्ष्य हे देखील नोट 8 लवकर लाँच करण्यामागचं कारण असू शकतं, असंही काही वृत्तांमध्ये म्हटलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
महाराष्ट्र






















