Samrtphones Tips : स्मार्टफोन वापरताना काय काळजी घ्याल; 'या' गोष्टी टाळल्याने फोन लवकर खराब होणार नाही
मोबाईलमधील वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स काम संपल्यानंतर अनेक जण ते बंद करत नाहीत. यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. हे फीचर्स बंद केल्याने फोनच्या प्रोसेसरची गतीही वाढते.
Tech News : स्मार्टफोन ही आजच्या जीवनाची सर्वात मोठी गरज बनली आहे. आपले बहुतेक काम आता स्मार्टफोनवरच होतात. याच कारणामुळे लोक आपला बहुतेक वेळ स्मार्टफोनवर घालवतात. अनेक स्मार्टफोन यूजर्स फोन वापरताना अनेक चुका करतात, ज्याचा परिणाम स्मार्टफोनवर होतो. आज या चुकांबद्दल बोलूया ज्यामुळे स्मार्टफोन खराब होऊ शकतो. जेणेकरुन चुका न करता स्मार्टफोनची लाईफ वाढवता येईल.
कनेक्टिव्हिटी फीचर्स काम झाल्यानंतर बंद करा
मोबाईलमधील वाय-फाय, जीपीएस आणि ब्लूटूथ सारखी कनेक्टिव्हिटी फीचर्स काम संपल्यानंतर अनेक जण ते बंद करत नाहीत. मात्र बंद करणे आवश्यक आहे. यामुळे बॅटरीचा वापर वाढतो. हे फीचर्स बंद केल्याने फोनच्या प्रोसेसरची गतीही वाढते.
Best Camera Phones : 108 मेगापिक्सलचे टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमत 20 हजारांहून कमी
गरज नसताना बॅटरी चार्ज करु नका
गरज असेल तेव्हाच मोबाईल चार्ज करा. बॅटरी 50-60 टक्के असताना मोबाईल चार्ज करू नका. असे केल्याने बॅटरीवर प्रेशर येतो आणि बॅटरी खराब होण्याची किंवा स्फोट होण्याची शक्यता वाढते. बॅटरी 20 टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तेव्हाच फोन चार्ज करा.
स्क्रीन ऑन टाईम कमी ठेवा
स्क्रीन ऑन टाईम जितकी जास्त असेल तितकी जास्त बॅटरी वापरली जाईल. फोनची बॅटरी वाचवण्यासाठी तुम्ही ब्राइटनेस कमी करू शकता. ऑटो ब्राइटनेस मोड वापरा. हे प्रकाशानुसार स्क्रीनची लाईट अॅडजस्ट करते. यामुळे बॅटरीचा वापर कमी होतो.
Smartwatch Tips : स्मार्टवॉच खरेदी करताना काही गोष्टी तपासून घ्या, नक्कीच फायदा होईल
गरज असेल तेव्हा व्हायब्रेशन मोड वापरा
अनेकजण ऑफिस किंवा कामात असताना फोन व्हायब्रेशन मोडवर ठेवतात. मात्र नंतर तो नॉर्मल मोडवर करण्यास विसतात. मात्र गरज असेल तेव्हाच व्हायब्रेशन मोड वापरा. बरेच लोक व्हायब्रेशन मोड नेहमी चालू ठेवतात. असे केल्याने फोनची बॅटरी लवकर संपते. बॅटरी लाईफ देखील कमी होते.