एक्स्प्लोर
जिओ ग्राहकांना दणका, डेटा पॅकच्या दरात वाढ
जिओनं पोस्टपेड आणि प्रीपेड प्राईम प्लॅनमध्ये बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार 309 रुपयांमध्ये 60 जीबी मिळणारा डेटा, आता केवळ 30 जीबी मिळणार आहे. तसेच 509 मध्ये मिळणारा 120 जीबी डेटा, आता केवळ 60 जीबी डेटा मिळणार आहे.

फाईल फोटो
मुंबई : तुम्ही जर रिलायन्स जिओ वापरत असला, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण आजपासून जिओनं प्राईम पोस्टपेड डेटा प्लॅनमधल्या शुल्कामध्ये वाढ केल्यानं तुमच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. जिओनं पोस्टपेड आणि प्रीपेड प्राईम प्लॅनमध्ये बदल केले आहेत. या नव्या बदलानुसार 309 रुपयांमध्ये 60 जीबी मिळणारा डेटा, आता केवळ 30 जीबी मिळणार आहे. तसेच 509 मध्ये मिळणारा 120 जीबी डेटा, आता केवळ 60 जीबी डेटा मिळणार आहे. रिलायन्स जिओनं 84 दिवसांच्या डेटा प्लानमध्ये तब्बल 15 टक्क्यांची वाढ केली आहे. या वाढीनुसार 84 दिवसांच्या प्लॅनसाठी तुम्हाला 459 रूपये मोजावे लागणार आहेत. ज्यामध्ये ग्राहकाला दिवसाला 1 जीबीचा 4जी डेटा वापरता येणार आहे. दुसरीकडे जिओनं एक खास ऑफरही दिली आहे. जिओने अवघ्या 52 रुपयांमध्ये एका आठवड्यासाठी, तर 98 रुपयांमध्ये 2 आठवड्यांसाठी फ्रि व्हॉईस, एसएमएस आणि अनलिमिटेड डेटा पॅक उपलब्ध करुन दिला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व























