एक्स्प्लोर

RIL AGM 2020 : गुगल जिओमध्ये 33,737 कोटी गुंतवणार, वाचा 10 मोठ्या घोषणा

मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलच्या सहभागाविषयीही माहिती दिली. जिओ प्लॅटफॉर्मवर गुगल 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आज महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. ही कंपनीची 43 एजीएम होती. विविध व्हर्च्यूअल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून रिलायन्सचे जवळपास एक लाखहून अधिक शेअर होल्डर या बैठकीत सामील झाले होते. यावेळी मुकेश अंबानी यांनी अनेक मोठ्या आणि महत्त्वाच्या घोषणा केल्या. मुकेश अंबानी यांनी जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुगलच्या सहभागाविषयीही माहिती दिली. जिओ प्लॅटफॉर्मवर गुगल 33,737 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

1. Google सोबत कराराची घोषणा

संकटाच्या वेळी मोठ्या संधीही येतात. रिलायंन्स इंडस्ट्री लिमिटेडचा मार्केट कॅप 150 बिलियन डॉलर्सच्या पुढे गेली आहे. मुकेश अंबानी यांनी गुगलबरोबर झालेल्या कराराचीही माहिती दिली. जियोमध्ये गुगल 7.7 टक्के समभाग गुंतवणूक करणार आहे. म्हणजेच जियोमध्ये गूगल 33 हजार 737 कोटींची गुंतवणूक करेल, असं मुकेश अंबानी यांनी सांगितलं.

2. तीन वर्षात 50 कोटींपेक्षा जास्त जिओ मोबाइलचे ग्राहक असतील

मुकेश अंबानी म्हणाले की, दहा लाखाहून अधिक घरे जिओ फायबरने जोडली गेली आहेत. जिओने 5 जी सोल्यूशन विकसित केले आहे. त्यामुळे तीन वर्षांत 50 कोटींपेक्षा जास्त जिओचे मोबाइल ग्राहक असतील.

3. जिओ व्हिडीओ मिटिंग अॅप 50 लाख लोकांनी डाउनलोड केले

50 लोक लोकांनी जिओ मीट अॅप डाऊनलोड केले आहे. हे व्हिडिओ मीटिंग अॅप नुकतच लॉन्च करण्यात आलं आहे.

4. जिओ तीन वर्षांत अर्धा अब्ज मोबाईल ग्राहक जोडणार

जिओ येत्या तीन वर्षांत अर्धा अब्ज मोबाईल ग्राहकांशी जोडला जाणार आहे. जिओने संपूर्ण 5 जी तंत्रज्ञान विकसित केली आहे. 5 जी स्पेक्ट्रम लवकरच उपलब्ध होणार आहे, त्याच्या चाचण्याही सुरू होतील, असे मुकेश अंबानी यांनी सांगितले. हे तंत्रज्ञान पुढील वर्षी फिल्डवर वापरण्यासाठी तयार केले जाऊ शकते.

5. भारतात जागतिक स्तरीय 5 जी सेवा आणणार

आम्ही भारतात जागतिक स्तरीय 5 जी सेवा आणणार आहोत. आम्ही जागतिक स्तरावर टेलिकॉम ऑपरेटर्सना 5 जी सोल्यूशन देऊ. जिओचा 5 जी सोल्यूशन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनसाठी समर्पित आहे.

6. भारताला 2G मुक्त करणार

भारत 5 जी युगाच्या दारात उभा आहे. सध्या 2 जी फोन वापरणार्‍या 35 कोटी भारतीयांना स्वस्त स्मार्टफोन देण्याचा प्रयत्न आहे. एजीएममध्ये फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांचा व्हिडिओ संदेशही दाखवण्यात आला.

Reliance AGM LIVE UPDATES | जियोच्या एज्युकेशन प्लेटफॉर्ममार्फत भारतामध्ये क्वॉलिटी टिचर्सची कमतरता पूर्ण करणार : ईशा अंबानी

7. रिलायन्स 150 बिलियन डॉलर्सची मार्केट कॅप असलेली पहिली भारतीय कंपनी बनली

रिलायन्स 150 बिलियन डॉलर्सची मार्केट कॅप असलेली पहिली भारतीय कंपनी बनली. कोरोना संकटातही भारत आणि जग वेगाने प्रगती करेल असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. प्रत्येक संकट आपल्यासोबत अनेक संधी घेऊन येतं.

8. कोरोना व्हायरसबद्दल म्हटलं की...

कोरोना व्हायरस मोठ आव्हान बनून आला आहे. भारत आणि जग वेगाने यातून सावरतील आणि चांगली प्रगती साध्य करतील.

9. जिओ डेव्हलपर्स प्रोग्रामच्या मदतीने अॅप डेव्हलपर आपले अॅप डेव्हलप करु शकतील

मुकेश अंबानी यांनी आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि किरण यांना बोलावून कंपन्यांच्या नवीन आणि नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचीही माहिती दिली. यादरम्यान आकाश अंबानी म्हणाले की, जियो डेव्हलपर्स प्रोग्रामच्या मदतीने कोणताही अॅप डेव्हलपर अॅप डेव्हलप करु शकतो, लॉन्च करु शकतो आणि मॉनिटाईज करू शकतो. जियोचे भागीदार बनू इच्छित असलेले अधिक माहितीसाठी http://developer.jio.com वर भेट देऊ शकतात. कोणताही युजर सेट टॉप बॉक्सच्या जिओ अॅप स्टोअरच्या माध्यमातून मनोरंजन, शिक्षण, आरोग्य, पाककला, योग, गेमिंग, धर्म इत्यादी विविध प्रकारच्या अ‍ॅप्सचा वापर करू शकतो. एजीएममध्ये JioTV+ ही सादर केलं. JipTV+ जगातील 12 आघाडीच्या ओटीटी कंपन्यांचा कन्टेंट उपलब्ध असेल. यात Netflix, Amazon Prime, Disney+ Hotstar, Voot, SonyLiv, Zee5, JioCinema, JioSaavn, YouTube इतर अनेक अ‍ॅप्स आहेत.

10. जियो प्लॅटफॉर्ममधील एकूण गुंतवणूकीने 2,12,809 कोटी रुपये जमा झाले

जिओ प्लॅटफॉर्म्सने 20 स्टार्टअप भागिदारी सोबत 4 जी, 5 जी, क्लाउड कम्प्यूटिंग, डिव्‍हाइसेस आणि ओएस, बिग डेटा, एआय, एआर/व्हीआर, ब्लॉकचेन, नॅचरल लॅग्वेज अंडरस्टॅडिंग आणि कॉम्प्युटर व्हिजन यासारख्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानाची निर्मिती केली आहे. आरआयएलने राइट्स इश्यू, जिओ प्लॅटफॉर्ममधील एकूण गुंतवणूक आणि बीपीद्वारे केलेली गुंतवणूक यांच्या माध्यमातून एकूण 2,12,809 कोटी रुपये उभे केले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget