एक्स्प्लोर
Advertisement
ग्राहकांसाठी खुशखबर, रिलायन्स जिओची नवी घोषणा
मुंबई : रिलायन्स जिओनं आपल्या ग्राहकांसाठी प्रार्ईम मेंबरशिपबाबत नवी घोषणा केली आहे. यात 15 एप्रिलपर्यंत प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना 'समर सरप्राईज ऑफर' अंतर्गत जिओची सेवा पुढील तीन महिने मोफत मिळणार आहे. आज 31 मार्चला जिओची मोफत सेवा संपणार आहे. त्यामुळे या ऑफरमुळे ग्राहकांना आणखी काही दिवस मोफत डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येईल
जिओची प्राईम मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना तीन महिने म्हणजेच जुलैपर्यंत जिओच्या वेलकम ऑफरप्रमाणेच अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा लाभ घेता येईल. जुलैमध्ये मात्र ग्राहकांना प्लॅनप्रमाणे रिचार्ज करावं लागेल. तीन महिने मोफत डेटा मिळवण्यासाठी ग्राहकांना प्राईम मेंबरशिप घेताना 303 किंवा त्यापेक्षा जास्तीच्या किंमतीचं रिचार्ज करणं गरजेचं असेल.
येत्या 15 एप्रिलपर्यंत प्राईम मेंबरशिप घेऊन पहिलं रिचार्ज करणारे ग्राहक या सुविधेसाठी पात्र असतील. दरम्यान आज 31 मार्च 2017 पर्यंत जिओची वेलकम ऑफर सुरु होती. या ऑफरमध्ये अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग फ्री देण्यात आलं होतं.
आतापर्यंत 7.2 कोटी ग्राहकांनी जिओची प्राईम मेंबरशिप घेतली आहे.
काय आहे जिओ प्राईम मेंबरशिप?
सध्या जिओ वापरत असलेल्या किंवा 31 मार्चपर्यंत जिओ सिम घेतील अशा ग्राहकांना 99 रुपयात प्राईम मेंबरशिप घेता येईल. या ऑफरनुसार जिओची मोफत 4G डेटा सेवा आणखी एक वर्षासाठी मिळेल.
जिओचे नवे दर आणि मेंबरशिपचे इतर फायदे लवकरच जिओ अॅपवर जाहीर केले जातील. मेंबरशिप घेणाऱ्या ग्राहकांना जिओचे सर्व अॅप एक वर्षासाठी मोफत वापरता येतील. तर जिओच्या सहयोगी कंपन्यांच्या ऑफर्सचाही लाभ घेता येईल, असं अंबानींनी सांगितलं.
मेंबरशिप घेतल्यास 303 रुपये प्रतिमहिना दराने 31 मार्च 2018 पर्यंत अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेटा (1GB प्रतिदिन) वापरता येईल. म्हणजेच आता जिओ वापरण्यासाठी प्रतिदिन 10 रुपये खर्च येणार आहे.
कसे व्हाल जिओचे प्राईम मेंबर?
प्राईम मेंबर होण्यासाठी सर्वात आधी jio.com वर जा.
होम पेजवर Get Jio Prime हे बटण दिसेल त्यावर क्लिक करा.
त्यानंतर 10 डिजिट असणारा जिओ नंबर टाका
यासाठी तुम्हाला 99 रुपयाचं ऑनलाईन पेमेंट करावं लागणार आहे.
दरम्यान, कंपनी आपल्या यूजर्सला प्रत्येक रिचार्जवर 50 रुपयांचं कॅशबॅकही देणार आहे. म्हणजे तुम्ही 49 रुपयात जिओचे प्राईम मेंबर होऊ शकतात.
दरम्यान, 1 एप्रिलपासून दर आकारले जाणार आहेत. मात्र, केवळ डेटा पॅकसाठी पैसे लागणार असून व्हॉईस कॉलिंग सेवा मोफत करण्यात आल्याचं, रिलायन्सकडून सांगण्यात आलं आहे.
‘’2017 अखेरपर्यंत संपूर्ण देशात जिओ नेटवर्क असेल’’
2017 अखेरपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यात जिओ नेटवर्क उपलब्ध असेल, अशी घोषणा अंबानींनी केली. तर एकूण 4G मोबाईल धारकांपैकी 99 टक्के युझर्सकडे जिओ असेल, असा दावाही त्यांनी केला.
एका दिवसात जिओ युझर्स व्हॉईस कॉलिंगचा वापर 200 कोटी मिनिट एवढा करतात. तर जानेवारीमध्ये एकूण 100 कोटी GB डेटा वापरण्यात आला असून प्रतिदिन 3.3 कोटी GB डेटा वापरण्यात येतो, असं अंबानींनी सांगितलं.
डेटा हा डिजिटल युगाचा श्वास आहे, त्यामुळे डिजिटल होण्यासाठी ग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी जिओ कटिबद्ध आहे. सर्वाधिक डेटा वापरणाऱ्या देशांमध्ये भारत सध्या अव्वल क्रमांकावर आहे. येत्या काळात आणखी बदल होतील, असं अंबानींनी सांगितलं.
5 सप्टेंबर 2016 रोजी जिओने 31 डिसेंबर 2016 पर्यंत मोफत सेवा दिली होती. त्यानंतर ही सेवा हॅप्पी न्यू ईयर ऑफरअंतर्गत चालू ठेवली आणि 31 मार्चपर्यंत जिओ युझर्सना मोफत सेवा दिली. मात्र आता दर आकारले जाणार आहेत.
संबंधित बातम्या:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
आरोग्य
महाराष्ट्र
Advertisement