एक्स्प्लोर
आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!
![आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल! Punekar Troll On Social Media After Rising Pune Defeat In Ipl Final Latest Update आयपीएलमधील पराभवानंतर पुणेकर सोशल मीडियावर ट्रोल!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2015/10/13165121/facebook-whatsapp.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: आयपीएलचा अंतिम सामना काल (रविवार) अतिशय रंजक झाला. अवघ्या एका धावेने मुंबई इंडियन्सनं रायझिंग पुणेवर विजय मिळवत जेतेपद पटकावलं. मुंबईनं पुण्याला हरवल्यानंतर सोशल मीडियावर पुणेकरांना ट्रोल करण सुरु झालं आहे. सामना संपताच व्हॉट्सॅप आणि फेसबुकवर पुणेकरांना ट्रोल करणारे जोक्स फिरु लागले.
आयपीएलचा अंतिम सामना मुंबई आणि पुणे या दोन संघांमध्ये रंगलेला असताना दोन्ही शहरातील चाहत्यांमध्ये सोशल मीडियातून अनोखं वॉरंही रंगलं होतं. मुंबईकर की पुणेकर कोण सरस यासाठी एकप्रकारची चढाओढ लागली होती. काल सकाळपासूनच सोशल मीडियावर जोक्सचा अक्षरश पाऊस पडत होता. पण अटीतटीचा सामना जिंकत मुंबईनं पुण्याला लोळवलं. त्यानंतर सोशल मीडियावर पुणेकरांना ट्रोल करणं सुरुच झालं.
सोशल मीडियामध्ये आलेले नेमके जोक्स काय होतो. यावर एक नजर टाकूयात...
1 बॉल मध्ये 4 हवे,
पण 1 ते 4 मध्ये आम्ही काहीच करत नाही
म्हणून आम्ही हारलो...
------
पुणे तिथे 1 रन उणे
------
पुण्याने मन जिंकलं मन... ट्रॉफी तर लक्ष्मीरोडला पण बनवून मिळेल...
------
वडा पाव भारी...
मिसळपाव घरी!
या सारख्या अशा अनेक खोचक वाक्यातून पुणेकरांना सध्या ट्रोल केलं जातं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
भारत
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)