(Source: ECI/ABP News/ABP Majha)
WTC Final 2021 : आजपासून सुरु होणार Ind Vs Nz महामुकाबला; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसे पाहता येतील Live Updates
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे
WTC Final 2021 : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये शुक्रवारपासून म्हणजेच आजपासून जागतिक कसोटी क्रिकेट अर्थात आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. क्रीडारसिकांना फार दिवसांपासून याच दिवसाची प्रतीक्षा होती. सामना केव्हा आहे, कोणता संघ या सामन्याचं जेतेपद पटकावेल आणि 'जगात भारी' ठरेल, असेच प्रश्न अनेक क्रीडारसिकांच्या मनात घर करत होते. हा सामना भारतीय संघानं जिंकल्यास विराट कोहली याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाच्या वाट्याला आलेलं हे मोठं यश ठरणार आहे.
सामना केव्हा खेळला जाणार ?
18 जूनपासून भारत आणि न्यूझीलंड या दोन संघांमध्ये WTC Final 2021 खेळला जाणार आहे.
कुठे पार पडणार सामना?
WTC Final 2021 चा हा सामना साऊथम्प्टनमधील एजेस बोल या स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
कुठे पाहता येणार सामन्याचं लाईव्ह कव्हरेज?
भारत आणि न्यूझीलंड या संघांत खेळल्या जाणाऱ्या या महामुकाबल्याचं लाईव्ह कव्हरेज अर्थात थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स 1 (Star Sports), स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी वर पाहता येणार आहे. तर, या सामन्याच्या धावसंख्येबद्दलचे आणि इतरही अपडेट्स तुम्हाला एबीपी माझाच्या संकेतस्थळावरही पाहता येणार आहेत. या सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग Disney + Hotstar वर पाहता येणार आहे.
दरम्यान, आजपासून सुरू होणार्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनची घोषणा झाली आहे. बीसीसीआयने सामन्याच्या एक दिवस आधी अंतिम सामन्यात भाग घेणार्या 11 खेळाडूंची घोषणा केली. अंतिम सामन्यात भारताने तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.