एक्स्प्लोर
डिसेंबर 2019पर्यंत 5G सेवा भारतात येण्याची शक्यता
इंटरनेटवर डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग करताचा स्पीड कधी कधी अत्यंत कमी वाटतो. पण दिवसागणिक बदलणाऱ्या टेक्नोलॉजीनं त्यावरही उपाय शोधला आहे.
मुंबई : इंटरनेटवर डाऊनलोडिंग आणि अपलोडिंग करताचा स्पीड कधी कधी अत्यंत कमी वाटतो. पण दिवसागणिक बदलणाऱ्या टेक्नोलॉजीनं त्यावरही उपाय शोधला आहे.
येत्या काही दिवसात 5 जीचे निकष निश्चित करण्याचा ट्रायचा प्रयत्न आहे. तसं झालं तर डिसेंबर 2019 पर्यंत भारतात 5 जी सेवा सुरु होऊ शकते.
काल (गुरुवार) मुंबईत झालेल्या 5 जीच्या प्रदर्शनात ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. 4 जी च्या तुलनेत 5 जीचा डाउनलोड स्पीड किमान २० पट ठेवण्याची अट ट्राय ठेवू शकते.
5 जीमुळे दैनंदिन जीवनात कोणते बदल होतील, याचं प्रेझेंटेशन काल मुंबईतल्या हॉटेल लिलामध्ये झालं. नोकीया, इन्टेल, सॅमसंग, जीओ आणि बीएसएनएल या सारख्या दिग्गज कंपन्यांनी यात उत्पादनांचं सादरीकरण केलं.
शहरी आणि ग्रामीण वाहतुकीच्या समस्येवर 5 जी हे चांगलं सोल्युशन असू शकेल, असा विश्वास नोकियाचे भारतातले विपणन प्रमुख अमितकुमार मारवा यांनी यांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बीड
राजकारण
राजकारण
Advertisement