एक्स्प्लोर
Advertisement
फेसबुकवरुन महिन्याला 90 हजार, उस्मानाबादच्या मोहितची कमाल
उस्मानाबाद : उस्मानाबादच्या कळंबसारख्या निम्न शहरी भागात राहणाऱ्या एका अमेझिंग तरुणाने कहाणी सर्वांसाठी कौतुकास्पद ठरत आहे. वयाच्या विशीत फेसबुकच्या जोरावर महिन्याला 90 हजार रुपये कमावणारा हा तरुण म्हणजे मोहित कोलंगडे. इंजिनिअरिंग ड्रॉप आऊट असलेल्या मोहितनं फेसबुक पेजेसवरुन वेबसाईट्स, न्यूज मीडिया, अँड्रॉईड अॅप्लिकेशन्स प्रमोट करुन फेसबुकच्या कमाईतून घर बांधायला घेतलं आहे.
बांधकाम पूर्ण झाल्यावर हे महाराष्ट्रातलं पहिलं फेसबुक हाऊस म्हणून ओळखलं जाईल. मोहित नव्या घराला फेसबुकचं नाव देणार आहे. मोहित कोलंगडेची तीन वेगवेगळी फेसबुक पेजेस आहेत. 'आईच्या गावात बाराच्या भावात', 'इंजिनिअरींग फंडा', आणि 'विश्वास नांगरे पाटील फॅन्स'. रोज पाच तास लॅपटॉपवर बसून मोहित फेसबुक पेजेस मॅनेज करतो. कधी कळंबमधून, कधी लातूरातून.
कोणत्या पेजला किती लाईक्स :
आईच्या गावात बाराच्या भावात - 4 लाख 82 हजार
इंजिनिअरिंग फंडा - 4 लाख 20 हजार
विश्वास नांगरे पाटील फॅन्स - अडीच लाख
हे लाईक्स मोहितच्या व्यवसायाचं भांडवल. 2010 नंतर सुरु झालेल्या तीनपैकी दोन पेजेसचा करमणूक हा एकमेव फंडा. हिंदी-इंग्रजीतून भाषांतरीत केलेले जोक्स, मराठीतल्या कलाकारांचे फनी एडीटेज फोटोज, फनी व्हिडिओज यावर अपलोड होतात. मोहितने मकरंद अनासपुरेला तर मराठीतला रजनीकांत म्हणून पेश केलं आहे.
हळूहळू पेजेसला लाईक्स वाढत गेल्या. मोहितनं 2012 नंतर पेजेसचा वापर वेगवेगळ्या वेब साईटला, न्यूज मिडीयाला प्रमोट करण्यासाठी केला. त्यातून मोहितला महिन्याला 90 हजारापर्यंत उत्पन्न मिळालं.
मोहित इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन्स इंजिनिअरींगचा ड्रॉप आऊट आहे. यावर्षी लातूरला कायद्याच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देत आहे. आपला मुलगा आभासी दुनियेतन नेमकं काय करतो याचा आई वडिलांना पत्ता नाही. मात्र मोहितनं कळंब कोर्टात कारकून असलेल्या वडिलांना घर बांधण्यासाठी 6 लाख दिले आहेत. बहिणीची एमएची परीक्षा फी भरली आहे.
मोहितनं स्वत:साठी मोबाईल, लॅपटॉप, दुचाकी घेतली आहे. 2010 पासून मोहितच्या शिक्षणासाठी कुटुंबाला खर्च करावा लागला नाही. माझा मुलगा कोणावरच अवलंबून नाही, असं त्याची आई अभिमानाने सांगते.
विश्वास नांगरे पाटलांच्या पेजवरुन मोहित फक्त तरुण मुलांना उभारी मिळेल अशाच पोस्ट टाकत असतो. ती मोहितची सामाजिक जबाबदारी आहे.
जानेवारी 2016 पासून गुगलच्या अॅड सेलचा रेट कमी झाल्यानं मोहितला पैसे देणाऱ्या वेबसाईटचाही महसूल कमी झाला आहे. सध्या परीक्षा असल्याने मोहितही पेजेससाठी फार वेळ देत नाही. तरीही मोहितचं सध्याचं मासिक उत्पन्न 40 हजार आहे.
पाहा व्हिडिओ :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
मुंबई
निवडणूक
निवडणूक
Advertisement