एक्स्प्लोर
नोकियाच्या अपकमिंग स्मार्टफोनबद्दल मोठा खुलासा
नवी दिल्लीः नोकियाच्या आगामी फोनची स्मार्टफोन प्रेमींना जोरदार उत्सुकता आहे. नोकिया D1C हा फोन पहिल्यांदा GFX बेंचमार्क वेबसाईटवर स्पॉट करण्यात आला होता. नवीन माहितीनुसार या फोनला 13.8 इंच आकाराची स्क्रिन आहे. त्यामुळे हा फोन नसून टॅब्लेट असण्याची शक्यता आहे.
नोकियाचा D1C हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजारात येणार आहे. या फोनचे काही फीचर्स नुकतेच समोर आले आहेत. ऑगस्टमध्ये नोकियाच्या 5320 आणि नोकिया 1490 या फोन्सला गीकबेंच साईटवर स्पॉट करण्यात आलं होतं. त्यानंतर आता बेंचमार्क साईट गीकबेंचवर या नव्या फोनला स्पॉट करण्यात आलं आहे.
नोकिया D1C हा स्मार्टफोन एक मिडबजेट स्मार्टफोन असणार आहे. गीकबेंचनुसार या फोनमध्ये 1.4GHz प्रोसेसर, 3 जीबी रॅम असणार आहे. शिवाय नोगट 7.0 ऑपरेटिंग सिस्टीम असणार आहे.
अनेक दिवसांनी नोकियाचं बाजारात कमबॅक होत असल्याने स्मार्टफोन प्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. या फोनच्या निमित्ताने नोकिया बाजारात पुन्हा एकदा सक्रिय होण्याचा प्रयत्न करणार आहे. दोन वर्षांपूर्वी मायक्रोसॉफ्टने नोकिया फोन्सची 7.2 अरब डॉलर्समध्ये खरेदी केली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
क्राईम
Advertisement