एक्स्प्लोर

Netflix Ads Plan : नेटफ्लिक्सकडून यूजर्ससाठी जाहिरातींवर आधारित स्वस्त प्लॅनची घोषणा; 'या' 12 देशांत होणार प्लॅन लागू

Netflix Ads Plan : Netflix च्या नवीन 'बेसिक विथ अॅड्स' योजनेची किंमत यूएस मध्ये $6.99 आहे, जी भारतीय चलनात सुमारे 575 रुपये आहे.

Netflix Ads Plan : Netflix ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन जाहिरात आधारित प्लॅन सादर केला आहे. हा नवीन प्लॅन पुढील महिन्यापासून म्हणजेच नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेटफ्लिक्सचा हा नवीन 'बेसिक विथ अॅड्स' प्लान सध्या 12 देशांमध्ये लागू होणार आहे. या देशांमध्ये ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, स्पेन, यूके आणि यूएस यांचा समावेश आहे. मात्र, सध्या तरी या देशांच्या यादीत भारताचा समावेश नाही. हा नवा बेसिक प्लॅन काय आहे ते जाणून घ्या. 

Netflix च्या 'Basic With Ads' प्लॅनची किंमत किती?

Netflix च्या नवीन 'बेसिक विथ अॅड्स' प्लॅनची किंमत यूएस मध्ये $6.99 आहे, जी भारतीय चलनात सुमारे 575 रुपये आहे. असे असेल तरी Netflix ने भारतात अजून कोणतीही स्किम सुरु केली नाही. सध्या नेटफ्लिक्सचा स्टँडर्ड प्लॅन भारतात बेसिकपेक्षा चांगला 500 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे.

Netflix चा नवीन जाहिरात प्लॅन कधी आणि कुठे सुरु होणार आहे हे पाहा. 

  • कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये 1 नोव्हेंबरपासून हा प्लॅन सुरु होईल.
  • 3 नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलिया, ब्राझील, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, कोरिया, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्समध्ये सुरु होईल.
  • 10 नोव्हेंबरपासून स्पेनमध्ये हा प्लॅन सुरु होणार आहे. 

नेटफ्लिक्सच्या नवीन प्लॅन संदर्भात माहिती 

Netflix च्या मते, या नवीन प्लॅनचे फायदे त्याच्या सध्याच्या बेसिक प्लॅन प्रमाणेच असतील पण यामध्ये किंमतीत थोडेफार बदल होतील. Netflix च्या बेसिक प्लॅनची ​​यूएसमध्ये किंमत $9.99 आहे आणि जाहिरातीसह नवीन बेसिकची किंमत $6.99 आहे. नवीन प्लॅनच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये कॉंटेंट, Personalised User Experience आणि Connected Devices यांची संख्या मूलभूत प्लॅन सारखीच आहे.

दोन्ही प्लॅनवर, यूजर्स फक्त 1 कनेक्ट केलेले डिव्हाईस वापरण्यास सक्षम असतील. यातील फरक असा असेल की यूजर्स कंपनीच्या नवीन जाहिरात-आधारित बेसिक प्लॅनमध्ये सिनेमा किंवा टीव्ही शो डाऊनलोड करू शकणार नाहीत. तसेच काही सिनेमे आणि शो बेसिक विथ अ‍ॅड्स प्लॅनवर सपोर्ट करणार नाहीत. Netflix च्या $6.99 प्लॅनसह, व्हिडीओ 720 पिक्सेल म्हणजेच HD मध्ये उपलब्ध असतील. या प्लॅनमध्ये यूजर्सना एका तासाच्या व्हिडीओ शोमध्ये 4-5 जाहिराती पाहायला मिळतील. जाहिरातींचा कालावधी 15-30 सेकंदांचा असेल, मात्र पहिला शो किंवा पहिला सिनेमा जाहिरात फ्री असेल.

महत्वाच्या बातम्या : 

WhatsApp Feature : भन्नाटच! आता व्हॉट्सअॅपचे मेसेजही Edit करता येणार; लवकरच येणार नवं फिचर

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Maharashtra live blog updates: अकोल्यात वेगवान राजकीय घडामोडी, एकनाथ शिंदेंचा खास माणूस अभय पाटील यांच्या भेटीला
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
Embed widget