एक्स्प्लोर

'मोटो जी 4'चे दोन व्हर्जन 17 मे रोजी लाँच होणार?

मुंबई : मोटो जी या मोटोरोलाच्या सर्वाधिक लोकप्रिय सीरिजमधील पुढील व्हर्जन म्हणजेच मोटो जी 4 याच महिन्यात लाँच होणार आहे. एवढंच नाही तर मोटो जी 4 सोबतच मोटो जी प्लस हे नवं व्हर्जनही लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे. यापूर्वी मोटो जी 3 आणि पाठोपाठ मोटो जी टर्बो हे नवीन व्हर्जन लाँच केलं होतं.     मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही पूर्णपणे वेगवेगळ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सचे स्मार्टफोन असतील.     मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही व्हर्जन याच महिन्यात म्हणजे 17 मे रोजी भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. मोटोरोलाच्याच एक्स सिरीजमधील नव्या स्मार्टफोनचंही लाँचिंग भारतात होणार आहे. त्याची तारीख अजून निश्चित करण्यात आलेली नसली तरी पुढील महिन्यात म्हणजे 9 जून रोजी मोटो एक्स मालिकेतील दोन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल होतील.     मोटो जी 4 किंवा मोटो जी फोर्थ जनरेशन किंवा मोटो जी 2016 असंही मोटो जी च्या नव्या स्मार्टफोनचं नाव असेल. मोटो जी 4 प्लस असं जास्तीचे आणि सुधारीत स्पेसिफिकेशन्स असलेल्या मॉडेलचं नाव आहे. मोटो जी 4 प्लस या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर हा आजवर फक्त हायएन्ड स्मार्टफोन्सपुरतंच मर्यादित असलेलं फीचर असणार आहे.     विन फ्युचर या टेक्नॉलॉजी साईटच्या रोनाल्ड क्वान्ट यांनी जारी केलेल्या सर्वात अलीकडच्या लीकनुसार, मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही स्मार्टफोन झुबा या आयात-निर्यातीवर लक्ष देऊन असलेल्या ट्रॅकिंग वेबसाईटवर झळकले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे मोटो जी 4 आणि मोटो जी 4 प्लस हे दोन्ही स्मार्टफोन भारतातच तयार झालेले आहेत. दोन्ही स्मार्टफोनच्या पॅकिंग कार्टनवर मेड इन इंडिया असं नमूद करण्यात आलंय. याचाच अर्थ या दोन्ही स्मार्टफोनचं असेंब्लिंग भारतात झालंय.     17 मे रोजी भारतात लाँच होणाऱ्या मोटो जी4 या स्मार्टफोनमध्ये 2जीबी रॅम, 16 जीबी मेमरी आणि 16 मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे तर मोटो जी 4 प्लस या व्हर्जन मध्ये 3जीबी रॅम, 32 जीबी मेमरी आणि 16 मेगापिक्सेल कॅमेरा असणार आहे. मोटो जी 4 प्लसचा कॅमेरा लेझर ऑटोफोकस तंत्राने सज्ज असेल तसंच दोन्ही स्मार्टफोनमध्ये एनएफसी म्हणजे 'नियर फिल्ड कम्युनिकेशन' कनेक्टिविटीचा पर्याय असेल.

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश

श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..

मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क

Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम

व्हिडीओ

Gold-Silver Price Today : जुलैच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी स्वस्त; जाणून घ्या आजचे नवे दर!
Zero Hour Full : खासदार, आमदारांच्या फुटीनंतर आता ठाकरेंनी आत्मचिंतन करायला हवं असं वाटतं का?
Uddhav Thackeray Special Report : ऑपरेशन टायगरनंतर उद्धव ठाकरे आत्मचिंतन करणार?
Raj Thackeray Special Report : फोडाफोडी, ऑपरेशनवर राज ठाकरेंची टीका, भाजपला इशारा
Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
संतापजनक! चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू, पोटातील बाळही दगावले; नातेवाईकांचा रुग्णालयातच आक्रोश
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले, उद्धव ठाकरेंची शिवसैनिकांना शाबासकी;फोनवरुन म्हणाले, तुमच्यासारख्या..
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
मोठी बातमी! कोल्हापूरच्या चंदगडमध्ये 55 गावांचा हेरे सरंजाम प्रश्न कायमस्वरूपी निकाली, 22 हजार कुटुंबाना मालकी हक्क
Rain Update: पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
पुण्यातील बाजीराव रोडवर झाडपडी; मुंबईतही कारवर कोसळलं झाड, पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम
भारत आणि पाकिस्तानमधील 117 प्रमुख व्यक्तींचे मोदी आणि शहबाज यांना पत्र; म्हणाले, 'वैर संपवा आणि संवाद, द्विपक्षीय संबंध पुन्हा सुरू करा..'

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, उद्या 2 जुलै रोजी शाळेला सुट्टी

वायरी उघड्या, स्कुटीवरुन जाणाऱ्या दोन मुलींना करंट, रस्त्यावरच कोसळल्या; पावसाच्या पाण्यात 5 वाहने गेली वाहून

राज ठाकरेंच्या वक्तव्यावरुन हक्कभंग होऊ शकतो; फोडाफोडीचं राजकारण तापलं, राम कदमांचा मनसेप्रमुखांना इशारा

Embed widget