चीनी मोबाईल कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आता 'देशभक्तीचा तडका' देत मायक्रोमॅक्स सज्ज, लॉन्च केले Micromax In Note 1 आणि Micromax In 1b
Micromax In Note ची किंमत 10,999 पासून सुरु होते तर Micromax In 1b ची किंमत 6,999 पासून सुरु होते. हे दोन्ही मॉडेल नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. कंपनीने देशवासियांना आत्मनिर्भर भारताची साद घातली आहे.
नवी दिल्ली: मायक्रोमॅक्स ने आपल्या "In" सीरीजच्या माध्यमातून पुन्हा भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे. Micromax In Note 1 आणि Micromax In 1b हे दोन नवीन लॉंच झालेले फोन आपल्याला स्टॉक अॅन्ड्रॉईडचा अनुभव देतात. हे दोन्ही फोन ग्राहकांना कोणतेही ब्लोटवेअर दाखवणार नाहीत अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच कंपनीने या दोन्ही मॉडेलसाठी दोन वर्षे नियमितपणे सॉफ्टवेअर अपडेट देण्याचे आश्वासन दिले आहे.
गुरुग्राममध्ये असणारी मायक्रोमॅक्स ही कंपनी एकेकाळी भारतीय मोबाईल जगतातील आघाडीची कंपनी होती. परंतु चीनच्या व्हिवो, ओप्पो आणि शिऑमी या मोबाईल कंपन्यांच्या भारतीय बाजारातील प्रवेशाने मायक्रोमॅक्सचा खप कमी झाला.
Micromax In Note हा मोबाईल स्टॉक अॅन्ड्रॉईडवर काम करतात. याला 6.67 इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. यात स्पिड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हिलियो जी 85 प्रोसेसर दिला आहे. यात 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज ची सुविधा आहे. यामध्ये 5000mAH बॅटरीची सुविधा दिली आहे आणि ती 18 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये रिवर्स चार्जिंगची सोय देखील आहे.
कॅमेरा या फोनला मागच्या बाजूला 48 मेगापिक्सेलचा एक कॅमेरा दिला आहे, तर दुसरा कॅमेरा हा 5 मेगापिक्सेलचा आहे. याचसोबत 2 मेगापिक्सेलचे दोन इतर कॅमेरे दिले आहेत. तर समोरिल बाजूला 16 मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.
याच्या 4GB RAM + 64GB सुविधा असणाऱ्या मोबाईलची किंमत 10,999 रुपये इतकी आहे तर 4GB RAM + 128GB सुविधा असणाऱ्या मोबाईलची किंमत 12,499 रुपये इतकी आहे. हा मोबाईल हिरव्या आणि पांढऱ्या रंगात उपलब्ध होणार आहे.
Micromax In 1b
हा मोबाईल स्टॉक अॅन्ड़ॉईडवर काम करतो. याची डिस्प्ले 6.5 इंच फुल एचडी आहे. यात स्पिड आणि मल्टिटास्किंगसाठी मीडियाटेक हिलियो जी 35 प्रोसेसर दिला आहे.
यात ड्युएल कॅमेरा सेटअप दिला आहे. प्रायमरी कॅमेरा सेंसर 13 मेगापिक्सेल तर प्रायमरी कॅमेरा सेंसर 8 मेगापिक्सेलचा आहे. यामध्ये 5000mAH बॅटरीची सुविधा दिली आहे आणि ती 10 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
2GB RAM + 32GB सुविधा असणाऱ्या मोबाईलची किंमत 6,999 इतकी आहे तर 4GB RAM + 64GB ची किंमत ही 7,999 इतकी आहे. हा मोबाईल तीन रंगात उपलब्ध होणार आहे.
देशभक्तीचा तडका मायक्रोमॅक्स चे संस्थापक राहुल शर्मा यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडियो शेअर केला आहे. त्यात ते मायक्रोमॅक्सचा प्रवासाबद्दल सांगतात. ते म्हणतात, "मायक्रोमॅक्सला त्याच्या देशातून चीनी कंपन्यांनी हद्दपार केले, त्यावेळी काही वाईट वाटले नाही. पण देशाच्या सीमेवर जे झाले ते वाईट झाले. त्य़ामुळे पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताच्य़ा स्वप्नासाठी मायक्रोमॅक्स देश के लिये पुन्हा एकदा आले आहे."
Hello everyone, yeh hai meri aur micromax ki ek choti si kahaani. We are ready to comeback, India ke liye. Are you IN for India? #MicromaxIsBack #AatmaNirbharBharat #INMobiles https://t.co/8PvVf4rMnv
— Rahul Sharma (@rahulsharma) October 16, 2020
अशा पध्दतीने मायक्रोमॅक्सने त्यांची बाजागपेठेतील लढाई मुख्यत: चीनी मोबाईल कंपन्यांशी आहे हे स्पष्ट केले.