एक्स्प्लोर
मायक्रोमॅक्सचा 4G स्मार्टफोन, किंमत 8,499 रुपये

मुंबई : भारताची स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने आपला 4G बजेट स्मार्टफोन 'कॅनव्हास इव्होक' लाँच केला आहे. हा फोन सध्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट फ्लिपकार्टवर मिळेल. महत्त्वाचं म्हणजे 'कॅनव्हास इव्होक' 4G स्मार्टफोनची किंमत अवघी 8,499 रुपये आहे. 'कॅनव्हास इव्होक'चे फिचर्स *डिस्प्ले - 5.5 इंच *रिझॉल्युशन - 1280×720 पिक्सल *प्रोसेसर -1.4GHz ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 415 * रॅम - 3GB * मेमरी - इंटरनल 16GB, मेमरीकार्डद्वारे वाढवण्याची क्षमता *कॅमेरा - एलईडी फ्लॅशसह 13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा *बॅटरी - 3000mAh *कनेक्टिव्हिटी - 4G LTE सपोर्ट. मायक्रो यूएसबी, वाय-फाय 802.11 बी/जी/एन, ब्लूटूथ 4.0, जीपीएस, ए-जीपीएस यासारखे फिचर्स उपलब्ध
आणखी वाचा























