एक्स्प्लोर
Meizu चा नवा स्मार्टफोन 'M3 मॅक्स' लॉन्च

मुंबई : चिनी कंपनी Meizu ने गेल्याच वर्षी M3E स्मार्टफोन लॉन्च केला होता आणि आता कंपनीने आपला नवा स्मार्टफोन M3 मॅक्स लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 16 हजार रुपये असणार आहे. 12 सप्टेंबरपासून या स्मार्टफोन प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असेल. 4100mAh क्षमतेची जबरदस्त बॅटरी हे या स्मार्टफोनचं आकर्षण ठरणार आहे. M3 मॅक्स स्मार्टफोनचे फीचर्स :
- हायब्रिड ड्युअल सिम
- 1.8GHz मीडियाटेक हेलियो P10 प्रोसेसर
- 3 जीबी रॅम
- 6 इंचाचा एचडी स्क्रीन (1080×1920 पिक्सेल रिझॉल्युशन)
- 64 जीबी इंटरनल मेमरी (एसडी कार्डच्या सहाय्याने 128 जीबीपर्यंत वाढवण्याची सुविधा)
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 3G
- 4G
- वाय-फाय
- जीपीएस
- ब्लूटूथ
- प्रॉक्जिमिटी सेंसर
- एम्बिएंट सेंसर
आणखी वाचा























