एक्स्प्लोर
मारुती सुझुकी विटारा ब्रेजाच्या मागणीत वाढ, तब्बल 6 महिन्यांची वेटिंग

नवी दिल्ली : मारुती सुझुकी विटारा ब्रेजा लॉन्च झाल्याला आता जवळपास दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, या गाडीच्या मागणीत दिवसागणिक वाढ होतना दिसते आहे. या सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीला बाजारात चांगला प्रतिसाद पाहायला मिळतो आहे.
आतापर्यंत मारुती सुझुकी विटारा ब्रेजाला 55 हजारांहून अधिक बुकिंग मिळाल्या असून, वाढत्या बुकिंगमुळे वेटिंग वाढली आहे. कंपनी आणि डिलर्सशी संपर्क साधल्यानंतर माहिती मिळते की, या गाडीची वेटिंग तब्बल 6 महिन्यांवर पोहोचली आहे.
खरंतर 6 महिन्यांची वेटिंग, यात आश्चर्याची बाबा नाही. कारण हल्ली एसयूव्ही कार्सना ग्राहकांकडून अधिक पसंती मिळते आहे. अनेक डिलर्सच्या मते, कारचं टॉप व्हेरिएंट ZDI+ ड्युअल-टोन ग्राहकांना पसंत आहे.
मारुती सुझुक विटारा ब्रेजा 98 टक्के भारतात तयार केली गेलीय. विशेष म्हणजे मेट्रो शहरांसह मध्यम स्वरुपाच्या शहरांमध्येही या कारला चांगल्याप्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे.
या कारच्या LDi व्हेरिएंटची किंमत 6.99 लाख रुपये ठेवण्यात आली असून, ZDi+ व्हेरिएंटची किंमत 9.68 लाख रुपये आहे. या दोन्ही किंमती दिल्लीतील एक्स-शोरुममधील असून, शहरानुसार बदलतील.
विटारा ब्रेजाला सध्या बाजारात असलेल्या इकोस्पोर्ट आणि महिंद्रा टीयूव्ही 300 ची टक्कर असेल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
विश्व
बीड
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
