एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पब्जीमुळे पती सोडून गेला, गर्भवतीची फेसबुक पोस्ट, महिनाभर पत्नीशी संपर्क नाही
मलै भाषेतील एक पोस्ट फेसबुकवर वायरल झाली असून त्यानंतर 'पब्जी'वर अंकुश आणण्याची मागणी होत आहे. संबंधित इसमाची ओळख पटलेली नसली, तरी साधारण महिन्याभरापासून तो आपल्याला सोडून गेल्याचा उल्लेख तरुणाच्या पत्नीने पोस्टमध्ये आहे.
क्वाला लंपूर : 'पब्जी' या ऑनलाईन गेमचं वेड जगभरातील तरुणाईला लागलेलं दिसत आहे. तहान-भूक हरपून तासनतास गेम खेळणारे 'पब्जी'वेडे आपल्यासाठी नवीन नाहीत. त्यातच एका मलेशियन वंशाच्या तरुणाने पब्जीपायी आपली गरोदर पत्नी आणि मुलाला सोडून दिल्याचं समोर आलं आहे.
मलै भाषेतील एक पोस्ट फेसबुकवर वायरल झाली असून त्यानंतर 'पब्जी'वर अंकुश आणण्याची मागणी होत आहे. संबंधित इसमाची ओळख पटलेली नसली, तरी साधारण महिन्याभरापासून तो आपल्याला सोडून गेल्याचा उल्लेख तरुणाच्या पत्नीने पोस्टमध्ये आहे.
या तरुणाच्या भावंडांनी त्याची 'पब्जी' जगताशी ओळख करुन दिली होती. त्यानंतर हे वेड व्यसनात कधी परावर्तित झालं, याची कोणालाच कल्पना नाही. तरुणाच्या 'पब्जी'वेडामुळे पत्नीसोबत त्याचे खटके उडू लागले. रात्रभर जागून तो पब्जी खेळायचा आणि सकाळी उशिरा उठायचा. पत्नीने त्याची कानउघाडणी केल्यावर तो तिलाच मदत न करत असल्याचं बोलत असे.
'पब्जी खेळण्यापूर्वी त्याचं व्यक्तिमत्त्व वेगळं होतं. चार वर्षांपूर्वी तो पब्जी खेळायला लागला आणि परिस्थिती हळूहळू वाईट होत गेली.' असा दावाही तिने केला आहे.
पब्जी या ऑनलाईन गेमचे जगभरात 200 मिलियन (20 कोटी) पेक्षा जास्त डाऊनलोड्स आहेत, तर 30 मिलियन (3 कोटी) यूझर्स रोज पब्जी खेळतात.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement