एक्स्प्लोर
Make my tripच्या को-फाउंडरचं वादग्रस्त ट्वीट, अनेकांकडून अॅप डिलीट
मुंबई: ऑनलाईन ट्रॅव्हल कंपनी Make my trip चा को-फाउंडर केयूर जोशीनं बीफ बॅनवर केलेलं एक ट्वीट त्याला चांगलंच महागात पडत आहे. गोमांस बंदीबाबत आणलेल्या नव्या कायद्याबाबत त्यानं निषेध व्यक्त केला आहे.
ट्वीटरवरुन त्यानं आपलं मत व्यक्त केलं आहे. 'कोणी काय खायचं हे पंतप्रधान मोदी आणि भाजप ठरवू शकत नाही.', 'मी मोदींचा कट्टर समर्थक आणि शुद्ध शाकाहारी आहे. पण आता खाण्याच्या स्वातंत्र्यासाठी मी बीफ खाणं सुरु करणार आहे.' असं ट्वीट केयूरनं केलं आहे.
पण त्याच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियातून त्याच्याविरोधात बरीच टीका सुरु झाली आहे. त्याच्या या ट्वीटनंतर अनेक यूजर्स Make my trip अॅप आपल्या मोबाइलमधून डिलीट करत आहेत. तसंच त्याचं रेटिंगही कमी करत आहेत. हा #BoycottMakeMyTrip हॅशटॅग वापरुन केयूरला ट्रॉल करण्यात येत आहे. यातील अनेकांनी आपल्या फोनमधील स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. ज्यामध्ये अॅप डिलीट करताना दिसत आहे.How can he be vegan for life after vowing to eat beef? Btw he deleted his account.. #BoycottMakeMyTrippic.twitter.com/H0HWBJx3lT
— Vishal Naik (@Vishal_VN) May 31, 2017
@KeyurJoshi_ has all freedom to eat BEEF in protest V have all my freedom to #BoycottMakeMyTrip in protest Let's SHUT down @makemytrip pic.twitter.com/7nWMucE10y — #GauravPradhan ???????? (@DrGPradhan) June 1, 2017ट्विटरवरील या टीकेनंतर केयूरनं आपलं ट्वीट डिलीट केलं आहे. त्याआधी त्यानं आपल्या ट्वीटसाठी माफीही मागितली. दरम्यान, सोशल मीडियावरील विरोध पाहता मेक माय ट्रिपनं एक ट्वीट केलं आहे. यात असं म्हटलं आहे की, 'श्री जोशी यांचे ट्वीट हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. मेक माय ट्रीपचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. आणि सध्या केयूर हे मेक माय ट्रीपचे कर्मचारीही नाहीत.' दरम्यान, काही दिवसांपूर्वीच स्नॅपचॅटच्या सीईओला देखील यूजर्सनं असाच दणका दिला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
बीड
Advertisement