एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
LG चा V20 जगातील Nougat ने लॅस पहिला अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन
मुंबई: LG ही कोरियन कंपनी आपला नवा स्मार्टफोन V20 येत्या सप्टेंबरमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. या स्मार्टफोनमध्ये अपकमिंग अॅन्ड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम Nougat 0.7 हे फिचर असेल. हा स्मार्टफोम हे फिचर असलेला जगातील पहिला स्मार्टफोन असणार आहे.
सर्वसाधारणपणे गूगलच्या नेक्सस डिव्हाईसलाच पहिल्यांदा अॅन्ड्रॉइड अपडेट मिळते. मात्र, LG चा V 20 आणि V 10 जगातील अपडेटेड स्मार्टफोन असणार आहेत.
कंपनीने येणाऱ्या काळात या स्मार्टफोनमध्ये आणखीन फिचर्स असतील असे स्पष्ट केले आहे. तसेच हे स्मार्टफोन प्रिमियम सेगमेंटमध्ये फ्लॅगशिपसाठी एक नवी सुरुवात असेल.
LG चा V 20 ड्यूअल डिस्प्ले आणि ड्यूअल फ्रंट कॅमेरासोबत लाँच होणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनच्या फिचरची माहिती दिली नाही. मात्र, काही रिपोर्टनुसार, LG V 20 मध्ये 5.5 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. ज्याची रिझॉल्यूशन कॉलिटी 1080 x 1920 असेल. या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 820 चिपसेट असेल. तसेच 3/4जीबी रॅमसोबत दोन व्हॉरिएंट 32 GB आणि 64 GBमध्ये असेल. ही रॅम 256 GBपर्यंत वाढवता येऊ शकेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement