एक्स्प्लोर

भारतीय आता 'गांधीगिरी'सोबत 'डाटा-गिरी'ही करतील : मुकेश अंबानी

मुंबई : भारतीयांनी 'गांधीगीरी'चं कौतुक केलं, आता ते 'डाटा-गिरी'चंही कौतुक करतील, असा विश्वास रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचे प्रमुख, मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. मुकेश अंबानी यांनी आज रिलायन्सच्या जिओ 4G सेवेचं अनावरण केलं.   रिलायन्सची जिओ 4G ही टेलिकॉम क्षेत्रात महाक्रांती ठरेल, असा विश्वासही मुकेश अंबांनीनी व्यक्त केला.   https://twitter.com/ANI_news/status/771231609290842112   जिओ 4G या सेवेवर तुम्हाला आयुष्यभर मोफत कॉलिंग, मोफत मेसेजेच, मोफत रोमिंग या सेवा उपलब्ध होणार आहेत.  तसंच डिसेंबर 2016 पर्यंत 4G डेटा फुकटात मिळणार आहे.   त्यानंतर केवळ आणि केवळ इंटरनेटसाठी पैसे द्यावे लागतील. पण हा दरही केवळ 50 रुपयात 1GB डेटा मिळणार आहे.   इंटरनेटचे चार्जेसचे सोडून तुम्हाला इतर कोणत्याही सेवेसाठी  पैसे द्यावे लागणार नाहीत. डिसेंबरनंतर एका जीबी डेटासाठी तुम्हाला फक्त 50 रुपये मोजावे लागणार आहेत.   जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन रिलायन्स जिओचा 4G प्लॅन हा जगातील सर्वात स्वस्त डेटा प्लॅन असल्याचा दावा मुकेश अंबांनीनी केला.  पंतप्रधान मोदी यांच्या व्हिजनच्या दृष्टीकोनातून ही सेवा महत्वाचं असल्याचं यावेळी मुकेश अंबानी यांनी म्हटलं.   इतक्या स्वस्त दरात टेलिकॉम सुविधा देणारी रिलायन्स ही पहिलीच कंपनी ठरली आहे. यामुळे टेलिकॉम क्षेत्रातील अनेक समीकरणंही बदलणार आहेत.   थोड्याच दिवसात दहा कोटी ग्राहक करुन जागतिक विक्रम करण्याची इच्छा असल्याचा मानस यावेळी मुकेश अंबानी यांनी बोलून दाखवला.   काय आहेत जिओची वैशिष्ट्ये?
  • आयुष्यभरासाठी आऊटगोईंग कॉलिंग फ्री. STD, लोकल कॉल लाईफटाईम फ्री
  • आयुष्यभरासाठी रोमिंग फ्री
  • ब्लॅकआऊट डे नाही म्हणजे सण, उत्सवाला SMS दर वाढणार नाही.
  • डेटासाठी जास्त खर्चाची गरज नाही
  • विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के वाढीव डेटा
  • डिसेंबरपर्यंत डेटा मोफत, त्यानंतर केवळ 50 रुपयात 1GB 4G डेटा
  या स्मार्टफोनवर चालेल जिओ 4G रिलायन्स जिओने काही स्मार्टफोन्ससाठी खास 4G ऑफर आणली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. रात्री 2 वाजल्यापासून लोक रांगा लावत आहेत. सॅमसंग, एलजी, पॅनासोनिक, मायक्रोमॅक्स, असूस, टीसीएल, अल्काटेल, एलवायएफ या कंपन्यांच्या 4G फोन्ससाठी ही ऑफर उपलब्ध आहे.   काय आहे जिओची ऑफर? रिलायन्स जिओ 4G सेवेची चाचणी करत आहे. यासाठी रिलायन्स LYF ब्रँडच्या सर्व फोन्सवर अनलिमिटेड व्हिडिओ कॉलिंग, अनलिमिटेड इंटरनेट, मेसेजेसची सुविधा देत आहे. जिओ सिम सक्रिय झाल्यानंतर 90 दिवसांसाठी ही ऑफर आहे.   या ऑफरसोबतच जिओकडून प्रिमियम अॅप सेवा देखील देण्यात येत आहेत. जिओ प्ले, जिओ एक्स्प्रेस न्यूज, जिओ ड्राईव्ह,  जिओ सिक्युरिटी आणि जिओ मनी अशा ऑफर्स सुरु आहेत. जिओ ऑन डिमांड ऑफरअंतर्गत टीव्ही शो, लाईव्ह टीव्ही आणि गाण्यांसाठी बीट्स उपलब्ध आहेत.   असं मिळवा जिओ सिम!
  • गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन Myjio अॅप डाऊनलोड करावं.
  • त्यानंतर get jio sim>agree>get jio offer>location>next button>
  • ही प्रोसेस केल्यानंतर ऑफर कोड दिला जाईल. ऑफर कोड आणि कागदपत्र घेऊन जवळच्या रिलायन्स स्टोअरला भेट द्या.

संबंधित बातमी

रिलायन्स जिओचा धमाका, लाईफ-टाईम फ्री कॉलिंग, 50 रुपयात 1GB 4G डेटा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी

व्हिडीओ

KDMC : कल्याण-डोंबिवलीमध्ये महापौर कुणाचा, भाजप की शिवसेनेचा? Special Report
Pune NCP Election Result : पुणे-पिंपरीकरांनी अजितदादांना संपवलं? फडणवीसांची स्ट्रॅटेजी काय?
Eknath Shinde BMC : साथीला महाशक्ती, तरी कुणाची भीती? Special Report
Ganesh Naik On Eknath Shinde : गणेश नाईकांनी केला टांगा पलटी, आता वादाला कलटी Special Report
Navneet Rana Amravati : मी भाजपसाठी काम करते, ठाकरेंची दुकान आता बंद, नवनीत राणांचा घणाघात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर; महाराष्ट्रासाठी 16 लाख कोटींहून अधिक गुंतवणुकीचे लक्ष्य
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
ठाकरेंचे चार माजी महापौर महापालिकेच्या सभागृहात; महायुतीला भिडणार, सत्ताधाऱ्यांवर अंकुश
EPFO : गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
गुड न्यूज, पीएफचे पैसे UPI द्वारे काढता येणार, ईपीएफओ एप्रिलपासून नवा पर्याय उपलब्ध होणार
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
Embed widget