एक्स्प्लोर
आयबॉलचा स्वस्त स्मार्टफोन लॉन्च, 3G कनेक्टिव्हिटीसह अनेक फीचर्स

मुंबई : आयबॉल कंपनीने आपला ‘अँडी 5N डूड’ हा स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची किंमत सुमारे 4 हजार 99 रुपये आहे. या फोनला 5 इंचाचा डिस्प्ले असून, 480×854 पिक्सेल रिझॉल्युशन आहे.
1.2GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 512 एमबी रॅम हे या स्वस्त स्मार्टफोनचं खास वैशिष्ट्य आहे. एवढ्या कमी किंमतीत याप्रकारचे फीचर्स आयबॉलने ग्राहकांना दिले आहेत.
कॅमेऱ्याबाबत बोलायचं तर, या फोनमध्ये 5 मेगापिक्सेलचा ऑटोफोकस रिअर कॅमेरा आणि 0.3 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 4 जीबी स्टोरेज असून, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 32 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधाही आहे.
कनेक्टिव्हिटीमध्ये 3G, वाय-फाय, ब्लूटूथ, मायक्रो-यूएसबीसारखे फीचर्स आहेत, तर 2000mAh क्षमतेची बॅटरीही या स्मार्टफोनमध्ये आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
लातूर
क्राईम
करमणूक
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
