एक्स्प्लोर
ह्युंदाई वेरना 1.4 लिटर पेट्रोल व्हेरिएंट लाँच, किंमत 7.79 लाख
ह्युंदाईनं 1.4 लीटर पेट्रोल इंजिन असणारं ई आणि ईएक्स असे दोन व्हेरिएंट लाँच करण्यात आले आहेत. यांची किंमत अनुक्रमे 7.79 लाख आणि 9.09 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
मुंबई : ह्युंदाईनं वेरना कारचं 1.4 लिटर पेट्रोल इंजिन व्हर्जन लाँच केलं आहे. 1.4 लिटर पेट्रोल इंजिन असणारी ही कार ई आणि ईएक्स अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रमे 7.79 लाख आणि 9.09 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
ह्युदांई वेरना 1.4 लिटर ई व्हेरिएंट : 7.79 लाख रुपये
ह्युदांई वेरना 1.4 लिटर ईएक्स व्हेरिएंट : 9.09 लाख रुपये
या कारमध्ये एलीट आय 20चं 1.4 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. याची पॉवर 100 पीएस आणि टॉर्क 132 एनएम आहे. यामध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. यामध्ये 1.6 लिटरचे सर्व फीचर देण्यात आले आहेत.
आता ह्युंदाई वेरना आता 1.4 लिटर पेट्रोल, 1.6 लिटर पेट्रोल आणि 1.6 लिटर डिझेल या तीनही इंजिनमध्ये उपलब्ध आहे. जास्त मायलेज हवं असणाऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे की, आता त्यांना पहिल्यापेक्षा कमी किंमतीला जास्त मायलेज देता येणारी वेरना कार मिळू शकणार आहे.
बातमी सौजन्य : cardekho.com
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement