एक्स्प्लोर
हीरोची नवी स्प्लेंडर आयस्मार्ट बाइक लाँच, अधिक इंधनबचतीचा कंपनीचा दावा
मुंबई: देशातील सर्वात मोठी बाइक उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉपने ग्राहकांसाठी स्प्लेंडर आयस्मार्ट मोटर बाइक लाँच केली आहे. पूर्णत: स्वदेशी बनावटीची असलेल्या या बाईकचे इंजिन ११० सीसी आहे. या आयस्मार्ट स्प्लेंडरची किंमत ५३,३०० रुपये आहे.
ही बाइक ७० ते ८० किलोमीटर प्रती लिटर मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे. बाइकला न्यूट्रल केल्यानंतर बाइकचे इंजिन १० सेकंदात काम करणे बंद होते, आणि फक्त क्लच दाबून बाइक पुन्हा सुरु करता येऊ शकते. यामुळे तुम्ही ट्रॅफिकमध्ये आडकल्यास बाइक अॅटोमॅटीक बंद होऊन पेट्रोलची बचत होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे.
ही बाइक गाव आणि वस्तीपर्यंत पोहचवण्याचा कंपनीचा उद्देश आहे. ही बाइक होंडाची शाइन, सुजुकीची हयाते, बजाजची डिस्कवर १२५ सीसी सारख्या बाइकशी स्पर्धा करेल असे कंपनीचे म्हणणे आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement