एक्स्प्लोर
GST : 1 जुलैपासून मोबाईल बिल महागणार!
नवी दिल्ली : देशात जीएसटी लागू झाल्यानंतर कर प्रणालीमध्ये मोठा बदल होणार आहे. जीएसटीमध्ये 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे टॅक्स स्लॅब ठेवण्यात आले आहेत. देशातील 81 टक्के वस्तू 0-18 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये येतात. त्यामुळे जास्तीत जास्त वस्तू स्वस्त होणार आहेत. तर काही वस्तू महाग होतील.
दूरसंचार क्षेत्रावर मात्र जीएसटीचा मोठा परिणाम होणार आहे. कारण जीएसटीमध्ये दूरसंचार सेवा 18 टक्के टॅक्स स्लॅबमध्ये ठेवण्यात आल्या आहेत, ज्यावर सध्या 15 टक्के कर लागतो. स्वाभाविकपणे कराचा भार कंपन्यांवर आल्यानंतर ग्राहकांच्या खिशालाही कात्री लागणार आहे.
जीएसटी कर प्रणाली पोस्टपेड युझर्ससाठी महागडी ठरणार आहे. आतापर्यंत ज्यांचं बिल 1 हजार रुपये येत होतं, त्यामध्ये 30 रुपयांची भर होऊन आता 1030 रुपये बिल येईल. तर प्रीपेड युझर्सला मिळणाऱ्या टॉकटाईममध्ये कपात केली जाऊ शकते. कारण 1 जुलैपासून फुल टॉकटाईम व्हाऊचर्समध्ये मिळणारा टॉकटाईम कमी केला जाण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या :
1 जुलैला सकाळी उठल्यानंतर या 10 गोष्टी माहित असू द्या....
जीएसटी लागू होण्यापूर्वी आज मध्यरात्री हॉटेल बंद राहणार!
महिला बचत गटाच्या सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी नाही : सरकार
जीएसटी लागू झाल्यानंतर या वस्तू महागणार!
जीएसटी कराविरोधात चित्रपट महामंडळ संपाच्या तयारीत
सोनं आणि हिऱ्यावर 3 टक्के जीएसटी, 1 जुलैपासून जीएसटी लागू
जीएसटी मंजुरीमुळे ‘मातोश्री’ला काय मिळणार? : वळसे-पाटील
जमीन आणि घरभाड्यावर जीएसटी लागणार!
कीर्तनकार, भागवत कथाकारांनाही जीएसटी, कररचनेत बदल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement