एक्स्प्लोर
भारतात गुगल पिक्सेल 2 ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स
या फोनच्या 128GB व्हेरिएंटची किमत 70 हजार रुपये आहे. तीन कलर व्हेरिएंटमध्ये हा फोन तुम्हाला खरेदी करता येईल.
![भारतात गुगल पिक्सेल 2 ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स Google pixel 2 selling started in India भारतात गुगल पिक्सेल 2 ची विक्री सुरु, किंमत आणि फीचर्स](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/11/01125034/Google-Showcase_AHUJ-1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : गुगल पिक्सेल 2 ची विक्री भारतात सुरु झाली आहे. भारतात पिक्सेल 2 ची किंमत 61 हजार रुपयांपासून सुरु होईल. तर या फोनच्या 128GB व्हेरिएंटची किमत 70 हजार रुपये आहे. तीन कलर व्हेरिएंटमध्ये हा फोन तुम्हाला खरेदी करता येईल.
फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, क्रोमा आणि विजय सेल्समध्ये हा फोन विक्रीसाठी उपलब्ध असेल. या फोनसोबत कंपनी दोन वर्षांची वॉरंटी देत आहे. शिवाय एचडीएफसी आणि बजाज फायनन्सने फोन खरेदी करण्याचा पर्याय दिला आहे.
5 ऑक्टोबर रोजी गुगलने पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL हे दोन्ही फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले होते. आता यातील पिक्सेल 2 ची भारतात विक्री सुरु झाली आहे.
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL चे फीचर्स
पिक्सेल 2 मध्ये जुन्या पिक्सेल फोनप्रमाणेच 5 इंच आकाराची स्क्रीन देण्यात आली आहे. तर पिक्सेल 2 XL मध्ये 6 इंच आकाराची स्क्रीन आहे. हे फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असतील. 64GB आणि 128GB व्हेरिएंटमध्ये हे फोन तुम्हाला खरेदी करता येतील. दोन्ही फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 835 प्रोसेसर आणि 4GB रॅम देण्यात आली आहे.
कॅमेऱ्याचं वैशिष्ट्य काय?
पिक्सेल 2 आणि पिक्सेल 2 XL वॉटरप्रूफ डिझाईनसह IP 67 सर्टिफाईड आहेत. कॅमेरा हे या फोनचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. या फोनमध्ये ड्युअल सेन्सर टेक्निक देण्यात आली आहे. शिवाय पिक्सेल 2 मध्ये स्पेशल पोर्ट्रेट मोडही देण्यात आला आहे.
दोन्ही फोनमध्ये 12.2 मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आहे. तर सेल्फीसाठी 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये ई-सिम सपोर्ट देण्यात आला आहे. म्हणजेच फोनमध्ये इंटिग्रेटेड सिम असतील. अँड्रॉईडची लेटेस्ट ओरियो 8.0 ही सिस्टम या फोनमध्ये असेल. चांगल्या साऊंड क्वालिटीसाठी स्टेरियो स्पीकर देण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भविष्य
राजकारण
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)