(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Father of Judo... कानो जिगोरो यांची 161वी जयंती; गुगलकडून डूडलद्वारे आदरांजली
Google नं दिलेल्या माहितीनुसार, आजचं Google Doodle लॉस एंजिल्सचे आर्टिस्ट Cynthia Yuan Cheng यांनी प्राध्यापक जिगोरो यांच्या 161व्या जयंतीनिमित्त तयार केलं आहे.
Google Doodle of Kano Jigoro : Google नं प्राध्यापक Kano Jigoro यांना त्यांच्या जयंतीनिमित्त डूडलद्वारे आदरांजली वाहिली आहे. जपानचे 'Father of Judo' म्हणून ओळखले जाणारे जिगोरो यांच्या जयंती निमित्त गूगलनं डूडल तयार करुन सन्मानित केलं आहे.
Google नं दिलेल्या माहितीनुसार, आजचं Google Doodle लॉस एंजिल्सचे आर्टिस्ट Cynthia Yuan Cheng यांनी प्राध्यापक जिगोरो यांच्या 161व्या जयंतीनिमित्त तयार केलं आहे. जाणून घेऊया प्राध्यापक जिगोरो आणि आजच्या गूगल डूडलबाबत सविस्तर...
आजचं गूगल डूडल अत्यंत खास असून जिगोरो यांच्या जयंतीनिमित्त अनेक स्लाइडमध्ये अॅनिमेटेड गूगल डूडल तयार केलं आहे. सर्वच स्लाइड्समध्ये जिगोरो यांचं संपूर्ण जीवन दाखवण्यात आलं आहे. पहिल्या स्लाइडमध्ये त्यांचा एक मोठा फोटो देण्यात आला आहे. त्यांच्याजवळ जुडो खेळणाऱ्या दोन व्यक्तींचा फोटो आणि पुस्तकांच्या फोटोसह दोन इतर फोटोही लावण्यात आले आहेत. दुसऱ्या स्लाईडमध्ये काही लोक बसलेले आहेत आणि दोन व्यक्ती जुडो-कराटे खेळताना दिसत आहेत.
तिसऱ्या स्लाइडमध्ये कराटेचे काही प्रकार दाखवण्यात आले आहेत. त्याच्या पुढच्या स्लाईड अशाच प्रकारे कराटेबाबत आहेत. जिगोरा आपल्या विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्शल आर्ट शिकवायचे, ते या स्लाईडमध्ये दाखवण्यात आलं आहे. आजचं गूगल डूडल (Google Doodle 28 October) एकूण 8 स्लाइड्सचं आहे.
कोण होते Kano Jigoro?
कानो यांचा जन्म 1860 मध्ये मिकेजमध्ये झाला होता. ते 11 वर्षांचे असताना आपल्या वडिलांसोबत टोकियोला गेले होते. शाळेत असताना त्यांना अनेक विपरित परिस्थितींचा सामना करावा लागला होता. आपली ताकद वाढवण्यासाठी त्यांनी Jujutsu च्या मार्शल आर्टचा अभ्यास करण्याचा निश्चय करण्यात आला होता. टोकियो विश्वविद्यालयात विद्यार्थी दशेत असताना त्यांना एक व्यक्ती भेटली. ज्यांनी त्यांना Jujutsu master and former samurai Fukuda Hachinosuke शिकवलं.
जेव्हा जिगोरो यांनी सर्वश्रेष्ठी प्रतिद्वंद्वीला पराभूत करण्यासाठी Jujutsu स्पॅरिंग मॅच दरम्यान एक पश्चिमी कुस्तीच्या डावाचा वापर केला, तेव्हा मार्शल आर्ट Jujutsu पासून वेगळं झालं. यापूर्वी Jujutsu यांना एकापेक्षा एक वरचढ डावांचा कुस्तीत समावेश करण्यासाठी ओळखलं जातं.
सन 1882 मध्ये जिगोरो यांनी आपली एक मार्शल आर्ट जिम Dojo सुरु केली होती. ज्याचं संस्थान टोकियोतील कोडोकन होतं. इथे त्यांनी अनेक वर्ष जुडोची नवी तंत्र, पद्धत विकसित केली. त्यानी 1893 मध्ये महिलांचाही या खेळात समावेश केला होता. 1909 मध्ये कानो आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे पहिले आशियाई सदस्य बनले आणि 1960 मध्ये जुडोला अधिकृत ऑलिम्पिक खेळ म्हणून मान्यता मिळाली.