एक्स्प्लोर
तब्बल 5000mAh क्षमतेची बॅटरी, जिओनीचा नवा फोन लाँच
हा फोन सप्टेंबर महिन्यातच चीनमध्ये लाँच करण्यात आला होता.

नवी दिल्ली : जिओनीचा एम 7 पॉवर हा जबरदस्त स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. 5000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6 इंच आकाराची स्क्रीन ही या फोनची सर्वात मोठी वैशिष्ट्य आहेत. हा फोन सप्टेंबर महिन्यातच चीनमध्ये लाँच करण्यात आला होता. जिओनी एम 7 पॉवरची किंमत भारतात 16 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. अमेझॉनवर 25 नोव्हेंबरपासून या फोनची विक्री सुरु होईल. या फोनच्या खरेदीसोबतच अनेक लाँचिंग ऑफर्सही देण्यात येणार आहेत. जिओकडून 100GB अतिरिक्त डेटा देण्यात येईल. जिओनी एम 7 पॉवरचे फीचर्स
- अँड्रॉईड 7.1.1 नॉगट
- 6 इंच आकाराची एचडी स्क्रीन
- 1.4GHz ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन 435 प्रोसेसर
- 4GB रॅम, 64GB इंटर्नल स्टोरेज
- 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा, 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- 5000mAh क्षमतेची बॅटरी
आणखी वाचा






















